मुंबई

एकनाथ शिंदेंच्या ७ पानी ठरावावर ३४ आमदारांनी केल्या सह्या

प्रतिनिधी

मराठी लोकांच्या हक्कासाठी लढणाऱ्या शिवसेनेला आपल्या तत्वांशी तडजोड करावी लागत आहे. आमचा पक्ष आणि आमच्या पक्षप्रमुखांनी गेल्या वर्षात प्रचंड वैचारिक तडजोड केली. सरकारच्या भ्रष्टाचाराबद्दल शिवसैनिकांमध्ये आणि लोकांमध्ये मोठा रोष आहे’, असे पत्र एकनाथ शिंदे यांनी विधानसभा उपाध्यक्षांना पाठवले आहे. या पत्रावर शंभूराज देसाई, प्रताप सरनाईक, एकनाथ शिंदे, बच्चू कडू, यामिनी जाधव, श्रीनिवास वनगा, संदीपान भुमरे, तानाजी सावंत यांच्यासह ३४ आमदारांच्या सह्या आहेत. शिंदे यांनी समर्थक आमदारांसह गुवाहाटीतील हॉटेलमध्ये बैठक घेतली. आमदारांबरोबर चर्चा करुन एक ७ पानी ठराव पास केला. या ठरावावर ३४ आमदारांच्या सह्या आहेत.

पत्रातील ठळक मुद्दे

 आमची भाजपसोबत निवडणूकपूर्व युती होती.

 आम्ही एकमताने ३१ ऑक्टोबर २०१९ साली एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी निवड केली होती.

 अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यावर झालेल्या कारवाईवरही एकनाथ शिंदे यांनी बोट ठेवले आहे.

 सरकारच्या भ्रष्टाचाराबद्दल लोकांमध्ये मोठा रोष.

 मलिक तुरुंगात असल्याने सरकारची प्रतिमा खराब होतेय.

 काँग्रेस, राष्ट्रवादीकडून भरपूर त्रास सहन करावा लागला.

 सेनेच्या विचाराविरोधात काँग्रेस राष्ट्रवादीसोबत सरकार बनविल्याने शिवसेनेत प्रचंड असंतोष आहे.

 शिवसेनेला आपल्या तत्वांशी तडजोड करावी लागत आहे.

 आमचा पक्ष आणि आमच्या पक्षप्रमुखांनी गेल्या वर्षात प्रचंड वैचारिक तडजोड केली.

 बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्ववादी पक्ष म्हणून स्वच्छ आणि प्रामाणिक सरकार देणे अपेक्षित होते.

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

विभवकुमारने केली लाथाबुक्क्यांनी मारहाण; स्वाती मालीवाल यांनी नोंदविला 'एफआयआर'

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

छगन भुजबळ नाराज; प्रचारात फारसे सक्रिय नसल्याने चर्चांना उधाण

सिंचन घोटाळ्यात तथ्य, मात्र अजितदादा दोषी नाहीत - फडणवीस