मुंबई

विक्रोळी येथे ४१ वर्षांच्या व्यक्तीची हत्या; गाडी पार्किंगवरून झालेल्या वादातून मारहाण

विक्रोळी येथे किताबउल्ला शेख या ४१ वर्षांच्या व्यक्तीची तिघांनी बेदम मारहाण करून हत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी विक्रोळी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून पळून गेललेया तिन्ही आरोपींना अटक केली आहे.

Swapnil S

मुंबई : विक्रोळी येथे किताबउल्ला शेख या ४१ वर्षांच्या व्यक्तीची तिघांनी बेदम मारहाण करून हत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी विक्रोळी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून पळून गेललेया तिन्ही आरोपींना अटक केली आहे. मोहम्मद तारीक जैनुर आब्दीन, जिशान अहमद इश्तियाक खान आणि फुरकान अहमद इश्तियाक अहमद खान अशी या तिघांची नावे आहेत. हत्येच्या याच गुन्ह्यात या तिघांनाही स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

गाडी पार्किंगवरून झालेल्या वादातून ही हत्या झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

ही घटना शुक्रवारी सायंकाळी विक्रोळीतील सूर्यनगर, इस्लामपुरा, नुराणी जामा मशिदीजवळ घडली. याच परिसरात मोहम्मद जुनेद आणि तिन्ही आरोपी राहतात. ते एकमेकांच्या परिचित होते. शुक्रवारी सायंकाळी परिसरात गाडी पार्किंग करण्यावरून तिघांनी वडील किताबउल्ला यांच्याशी वाद घातला होता. नंतर त्यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. काही वेळानंतर या तिघांनी त्यांच्यावर लोखंडी स्कूल, हातातील कडे आणि लोखंडी पाइपने प्राणघातक हल्ला केला. त्यात किताबउल्ला यांच्या डोक्याला दुखापत झाली होती. त्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांना मृत घोषित केले होते. हल्ल्यात मोहम्मद जुनेदलाही दुखापत झाली होती. त्याला प्राथमिक औषधोपचारानंतर सोडून देण्यात आले होते. ही माहिती मिळताच विक्रोळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

याप्रकरणी मोहम्मद जुनेदच्या तक्रारीवरून तिन्ही आरोपीविरुद्ध पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या तिघांना पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यात ते तिघेही सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

महाराष्ट्र जनविश्वास अध्यादेश : किरकोळ अपराधासाठी आता फक्त दंड, तुरुंगवास नाही; ७ कायद्यांतील छोटे गुन्हे 'डिक्रिमिनलाइज'

Navi Mumbai : वन खात्याच्या बोटचेप्या धोरणाचा फटका महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना; आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीटीसह अनेकांवर परिणाम

तिरुमला तिरुपती देवस्थानास वांद्रे येथील जमीन; ३० वर्षांसाठी नाममात्र १ रुपया भाडे; ३९५ चौ.मी जमिनीवर पार्किंग, कार्यालय

Mumbai : बिग बींची स्मार्ट गुंतवणूक! अमिताभ बच्चन यांनी विकले गोरेगावमधील दोन आलिशान फ्लॅट्स; १३ वर्षांत तब्बल ३.८ कोटींचा नफा

'पान मसाला' जाहिरातीवरून सलमान खानला नोटीस; भाजप नेत्याने दाखल केली तक्रार