मुंबई

मुंबईत ५० टक्के मंडपांना परवानगी; एकूण २७१८ गणेशोत्सव मंडळांचे अर्ज, सर्वाधिक अर्ज के-पूर्व विभागातून 

मुंबई महापालिकेकडे या वर्षी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडप परवानगीसाठी एकूण २७१८ मंडळांनी अर्ज केले असून आतापर्यंत त्यापैकी १०८४ म्हणजे ५०.१८ टक्के मंडळांना परवानगी देण्यात आल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Swapnil S

मुंबई : मुंबई महापालिकेकडे या वर्षी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडप परवानगीसाठी एकूण २७१८ मंडळांनी अर्ज केले असून आतापर्यंत त्यापैकी १०८४ म्हणजे ५०.१८ टक्के मंडळांना परवानगी देण्यात आल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

आतापर्यंत पालिकेच्या सर्व २४ विभाग कार्यालयांच्या क्षेत्रात एकूण १३६४ मंडळांना मंडपासाठी परवानगी मिळाली आहे. तर, विविध स्तरांवर २०६ अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. सध्या ११४८ अर्जांवर मंजुरीसाठी प्रक्रिया सुरू आहे. 

पालिकेकडे यंदा मंडप परवानगीसाठी एकूण ३११७ अर्ज आले होते. त्यापैकी ३९९ अर्ज हे पुनरावृत्ती स्वरूपात असल्याने बाजूला काढण्यात आले. सर्वाधिक २४३ अर्ज के-पूर्व विभागातून प्राप्त झाले, तर सर्वात कमी म्हणजे २५ अर्ज बी विभागातून आले आहेत. 

सध्या २२२ अर्ज एईएमच्या स्तरावर, वाहतूक विभागाकडे ४३१ प्रलंबित आहेत. वाहतूक पोलिसांनी १५८३ मंडळांना ना हरकत दिली असून ४३ अर्ज नामंजूर केले आहेत.

स्थानिक पोलिसांनी नऊ प्रकरणांत मंजुरी दिलेली नाही, अशी माहिती देण्यात आली.

मंजुरीची प्रक्रिया

सुरू असलेले अर्ज- ४२.२४ टक्के.

नामंजूर केलेले अर्ज - ७.५८ टक्के.

एईएम स्तरावर मंजूर अर्ज - २३०१.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी