मुंबई

९९ लाखांच्या एमडी आणि चरसह सहाजणांना अटक

आरोपींकडून पोलिसांनी ३४३ ग्रॅम वजनाचे एमडी, १ किलो ७ ग्रॅम वजनाचे चरस, एक ऍक्टिव्हा बाईक असा मुद्देमाल जप्त केला

नवशक्ती Web Desk

मुंबई : सुमारे ९९ लाख रुपयांच्या एमडी आणि चरससह सहाजणांना खार आणि अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. या आरोपींकडून पोलिसांनी ३४३ ग्रॅम वजनाचे एमडी, १ किलो ७ ग्रॅम वजनाचे चरस, एक ऍक्टिव्हा बाईक असा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून, याच गुन्ह्यांत त्यांना लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. खार पोलिसांनी साध्या वेशात पाळत ठेवून तौफिक शमशुल हक अहमद आणि भैरवकुमार गंगाप्रसाद चौधरी या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलिसांनी तीस लाखांचे एक किलो चरसचा साठा जप्त केला. दुसऱ्या कारवाईत आझाद मैदान युनिटने कुर्ला येथील कुरेशी नगर येथून दोन तरुणांना अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी २५७ ग्रॅम एमडी आणि एक ऍक्टिव्हा असा ५२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. तिसऱ्या कारवाईत मशिद बंदर येथून अन्य दोन तरुणांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्या अंगझडतीत पोलिसांना ८५ ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज सापडले. त्याची किंमत सतरा लाख रुपये इतकी आहे.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री