मुंबई

४ वर्षाच्या बालकावर कॉक्लिअर इम्प्लान्ट शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार

प्रतिनिधी

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कांदिवलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात एका ४ वर्ष वयाच्या व जन्मतः कर्णबधीर असलेल्या बालकावर कॉक्लिअर इम्प्लान्ट शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे. महानगरपालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांमध्ये प्रथमच अशा प्रकारची शस्त्रक्रिया झाली आहे. विशेष म्हणजे महागड्या स्वरुपाच्या या शस्त्रक्रियेसाठी लागणारे उपकरण व इतर वैद्यकीय खर्च समाजसेवी संस्थांनी उचलला असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान, कॉक्लिअर इम्प्लान्ट झालेल्या बालकाची प्रकृती स्थिर असून ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्याबद्दल बालकाच्या आई-वडिलांनी समाधान व्यक्त केले आहे.

महानगरपालिकेच्या कांदिवली (पश्चिम) येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयातील डी.एन.बी. शिक्षक डॉ. राजेश यादव आणि त्यांच्या सहका-यांनी कॉक्लिअर इम्प्लान्टचे महत्त्व जाणून या शस्त्रक्रियासाठी विशेष प्रयत्न केले. आर्थिकदृष्ट्या गरीब एका शेतकरी कुटुंबातील फळविक्रेत्याचा चार वर्षाचा मुलगा जन्मत: मूक-बधीर आहे. या बालकाच्या उपचारांकरीता त्याच्या आई-वडिलांनी खूप ठिकाणी प्रयत्न केले. आर्थिकदृष्ट्या अडचणींमुळे मोठ्या रुग्णालयांत जाणे परवडत नसल्याने त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचारांकरीता या बालकाला आणले. त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी कॉक्लिअर इम्प्लान्ट करण्याविषयी सुचविले. मात्र, या शस्त्रक्रियेचा उपकरण व इतर खर्च देखील परवडणार नसल्याचे या कुटुंबाने सांगितले. त्यांची एकूणच परिस्थिती लक्षात घेता आणि या लहानग्याला श्रवणशक्ती देण्याचा निर्धार करुन रुग्णालयातील मानसेवी तज्ज्ञ डॉ. धोंड, नोबल फाऊंडेशन, डॉ. भरत जोबनपुत्रा व एड्स कॉम्बॅट यांनी मिळून आर्थिक पाठबळ उभे केले. त्यानंतर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयात कॉक्लिअर इम्प्लान्टची पहिली शस्त्रक्रिया सोमवारी, ८ जुलैला रोजी यशस्वीरित्या पार पडली. महानगरपालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांत प्रथमच अशा प्रकारची शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याचे प्रशासनाकडुन सांगण्यात आले.

Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीला किती जागा मिळणार? शरद पवारांनी वर्तवला अंदाज

पाच वर्षाच्या मुलामुळे बंद होणार दारूची दुकाने, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

EVM की खेळणं! BJP नेत्याच्या लहान मुलानं केलं मतदान; नेत्यावर गुन्हा दाखल, अधिकारी निलंबित

Nagpur Shocker : शाळेतून घरी सोडणाऱ्या रिक्षाचालकाने केला १० वीच्या मुलीचा विनयभंग; Video व्हायरल झाल्यावर घटना उघडकीस

मुंबईचा आवाज संसदेत 'असा' घुमणार,नवशक्तिच्या परिसंवादात उमटले मुंबईकरांच्या आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब!