मुंबई

कांदिवली येथील अपघातात ६४ वर्षांच्या वृद्धाचा मृत्यू

जखमी झालेल्या चौघांनाही पोलिसांनी तातडीने जवळच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केले

नवशक्ती Web Desk

मुंबई : कांदिवली येथील एका अपघाताच्या घटनेत सोहनसिंग निर्मलसिंग चना या ६४ वर्षांच्या वयोवृद्धाचा मृत्यू झाला, तर रिक्षा व टेम्पोचालकासह एक महिला जखमी झाली. याप्रकरणी समतानगर पोलिसांनी अपघाताची नोंद करून कारचालक मिलन कोठारी याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. जखमीमध्ये रिक्षाचालक सखावत अशरफ अन्सारी, टेम्पोचालक विजय चव्हाण, रिक्षातील प्रवासी तनुजा सहानी यांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. हा अपघात शनिवारी सायंकाळी साडेचार वाजता कांदिवलीतील पश्‍चिम दुतग्रती महामार्गावरील टाईम्स ऑफ इंडिया इमारतीजवळ झाला. सखावत अन्सारी हा रिक्षाचालक असून, तो बोरिवलीतील गणपत पाटील नगरात राहतो. शनिवारी तो एका प्रवाशी महिलेस मिरारोड येथून मालाडच्या दिशेने जात होता. ही रिक्षा सायंकाळी साडेचार वाजता टाईम्स ऑफ इंडिया इमारतीजवळ येताच मागून येणाऱ्या कारने रिक्षाला धडक दिली. त्यात त्यांची रिक्षा पलटी झाली होती. त्यानंतर कारने एका बाईकस्वारासह टेम्पोला धडक दिली होती. या अपघातात सखावत अन्सारी, रिक्षातील महिला प्रवासी तनुजा सहानी, टेम्पोचालक विजय चव्हाण आणि बाईकस्वार सोहनसिंग चना असे चारजण जखमी झाले होते. अपघाताची माहिती मिळताच समतानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या चौघांनाही पोलिसांनी तातडीने जवळच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केले. तिथे बाईकस्वार सोहनसिंग चना यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले तर सखावतसह विजय यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तनुजा या महिलेस किरकोळ दुखापत झाल्याने तिला प्राथमिक औषधोपचारानंतर सोडून देण्यात आले.

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

मद्य परवान्यावरून सरकारचा सावध पवित्रा; विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय परवाने वाटप नाहीच -अजित पवार

अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज पृथ्वीकडे परतणार

जनसुरक्षा कायदा ‘अर्बन नक्सल’विरोधात उपयुक्त ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘फिल्डिंग’; काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच, 'ही' नावे चर्चेत