मुंबई

जोडीदारासोबत संबंध प्रस्थापित करत असताना ६६ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

प्रतिनिधी

कुर्ला येथील एका हॉटेलमधील खोलीत आपल्या जोडीदारासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करत असताना ६६ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला.

कुर्ला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत वृद्ध वरळी कोळीवाडा परिसरातील रहिवासी असून तो राहत असलेल्या इमारतीत ही महिला घरकाम करते. हॉटेल व्यवस्थापनाने पोलिसांना सांगितले की हे दोघे वारंवार हॉटेलमध्ये येत असत.

त्यांनी सोमवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास चेक इन केले आणि थोड्या वेळाने, महिलेने रिसेप्शनवर कॉल केला की सोबत आलेला माणूस बेशुद्ध पडला आहे. हॉटेलच्या कर्मचार्‍यांनी त्यांना सायन रुग्णालयात नेले, तेथे दाखल करण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने कुर्ला पोलिसांना घटनेची माहिती दिली. चौकशीसाठी घटनास्थळी एक पथक पाठवण्यात आले. पोलिसांनी महिलेचा जबाब नोंदवला, तिने सांगितले की मृताने शरीर संबधाच्यावेळी दारू प्यायली होती.

“मृत व्यक्तीच्या शरीरावर कोणत्याही जखमा नाहीत आणि शिवाय तपासात इतर कोणतीही संशयास्पद बाब आढळून आलेली नाहीत. मृत्यूचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी पोलीस शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहोत. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, असे कुर्ला पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र होवळे यांनी सांगितले.

मराठवाड्यात संततधार पाऊस; गावांचा संपर्क तुटला, जनजीवन विस्कळीत

"हास्यास्पद नाटकं करून सत्य लपवता येत नाही"; संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तानवर भारताचा घणाघात

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; हवामान खात्याचा इशारा

गायक झुबीन गर्ग मृत्यू प्रकरण : आयोजक व मॅनेजरवर लुकआउट नोटीस जारी; मुख्यमंत्री सरमा म्हणाले, अन्यथा...

MPSC ची राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलली