मुंबई

उपनगरात थंडीची चाहुल; किमान तापमान १८.५ अंश सेल्सिअस

मुंबई उपनगरात थंडीला सुरुवात झाली असून तापमानात घट नोंदवली जात आहे. सांताक्रुझ केंद्रात गुरुवारी उपनगरातील किमान तापमान १८.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. असे असले तरी कुलाबा केंद्रावर मात्र किमान तापमान स्थिर आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबई उपनगरात थंडीला सुरुवात झाली असून तापमानात घट नोंदवली जात आहे. सांताक्रुझ केंद्रात गुरुवारी उपनगरातील किमान तापमान १८.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. असे असले तरी कुलाबा केंद्रावर मात्र किमान तापमान स्थिर आहे.

उत्तरेतील थंड वाऱ्यामुळे राज्यातील किमान तापमान घटत आहे. मागील तीन ते चार दिवसांपूर्वी उपनगरातील तापमान १९ अंशापर्यंत पोहोचले होते. गुरुवारी त्यामध्ये आणखी घट झाली. गुरुवारी सांताक्रुझ केंद्रावर १८.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. त्यामुळे वातावरणात गारवा जाणवत होता. नोव्हेंबर महिन्यात प्रथमच किमान तापमान १९ अंशाखाली गेले आहे.

कुलाबा केंद्रावर किमान तापमान स्थिरच

कुलाबा केंद्रावर किमान तापमान स्थिरच आहे. गुरुवारी कुलाबा येथे २३ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली. मुंबई उपनगरात किमान तापमानात घट झाली असली तरी कुलाबा येथील तापमान मात्र स्थिरच आहे. त्यामुळे उपनगरात जरी थंडीची चाहुल लागली असली तरी मुंबई शहरात थंडीची प्रतीक्षा आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी