मुंबई

प्रतीक्षानगर येथील सोसायटीत आग; जीवितहानी नाही

या दुर्घटनेमुळे प्रतीक्षानगर बस आगारातील बसेस अन्य मार्गावर वळवण्यात आल्या होत्या,

प्रतिनिधी

मुंबई : सायन प्रतीक्षानगर सुंदर विहार येथील तळ अधिक सात मजली वृंदावन इमारतीच्या चौथ्या मजल्यावर सोमवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास आग लागली. या दुर्घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. या दुर्घटनेमुळे प्रतीक्षानगर बस आगारातील बसेस अन्य मार्गावर वळवण्यात आल्या होत्या, असे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले. प्रतीक्षानगर सुंदर विहार कुमकुम सोसायटीच्या मागे वृंदावन इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील एका घरात सोमवारी दुपारी आग लागली. मुंबई अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र घरातील सामान जळून खाक झाले. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण समजू शकलेले नाही.

Mumbai : मढमधील बेकायदा बंगल्यांच्या बांधकामांसाठी शेकडो बनावट नकाशे : ४ बड्या अधिकाऱ्यांना कोर्टाचा दणका

Mumbai : कांदिवली, मालाड विभागातील 'हे' ७ पूल धोकादायक; लवकरच होणार पुनर्बांधणी

विजयी मेळावा मराठीपुरताच! त्याचा राजकारणाशी संबंध नाही, राज ठाकरेंच्या वक्तव्याने शिवसेना-मनसे युतीबाबत संभ्रम

निवडणूक आयोगाला फक्त चिन्ह देण्याचा अधिकार; उद्धव ठाकरेंची टीका

अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचा परतीचा प्रवास सुरू; आज दुपारी ३ वाजता कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्याजवळ उतरणार