मुंबई

लवकरच प्रभादेवी - परळ रेल्वे स्थानकावरून जाणार दुमजली उड्डाणपूल

देवांग भागवत

येत्या काही वर्षात ४.५ किमी लांबीच्या वरळी-शिवडी उन्नत मार्गिकेत प्रभादेवी आणि परळ रेल्वे स्थानकावरून दुमजली उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडकडून अशाप्रकारचा पहिलाच पूल बांधण्यात येणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) मदतीने हा पूल उभारला जाणार आहे. सद्यस्थितीत मध्य रेल्वेने या पुलाच्या आराखड्याला मंजुरी दिली असून पश्चिम रेल्वेकडून अद्याप मंजुरी मिळाली नसल्याचे महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडकडून सांगण्यात आले.

एमआरआयडीसी आणि मुंबई महानगरपालिकेच्या संयुक्ताने ११ रस्ते, उड्डाणपुल बांधण्यात येणार आहेत. त्यामध्ये रेल्वे हद्दीतील उड्डाणपूलही असून काही पुलांच्या किरकोळ कामांना सुरुवात झाली आहे. याबरोबरच एमआरआयडीसी आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)मार्फतही ७ उड्डाणपुल बांधण्यात येणार असून त्यात मुंबईतील शिवडी आणि प्रभादेवी-परळ रेल्वे स्थानकावरील उड्डाणपुलाचाही समावेश आहे. यामध्ये पश्चिम रेल्वेच्या प्रभादेवी आणि मध्य रेल्वेच्या परळ रेल्वे स्थानकावरील समान असलेला उड्डाणपूल पाडून त्याजागी नवीन उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. हा उड्डाणपूल दुमजली असणार आहे अशी माहिती प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे. दरम्यान, या पुलाच्या रेखाचित्राला एमएमआरडीए तसेच पश्चिम आणि मध्य रेल्वेनेही मान्यता दिल्याचे सांगण्यात आले. पुलाच्या आराखड्याला मध्य रेल्वेकडून मंजुरी मिळाली असून पश्चिम रेल्वेच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे.

भर सभेत रडले रोहित पवार...सुप्रिया सुळेंच्या प्रचारसभेत नेमकं काय घडलं?

घसा बसलेला असतानाही शरद पवारांनी केलं भाषण, सुप्रिया सुळेंची सांगता सभा गाजवली

भारतीय महिला ऑस्ट्रेलिया, पाकिस्तानसह एकाच गटात; महिलांच्या टी-२० विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर

बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना जमावानं जीव जाईपर्यंत मारलं, नेमका कुठं घडला प्रकार?

कांदा निर्यातबंदी उठवली! ४० टक्के निर्यातकरामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष कायम