बेकायदा भारतीय पासपोर्टसह बांगलादेशी नागरिकाला मुंबई विमानतळावर अटक 
मुंबई

एक कोटीच्या गोल्डसह चारजणांच्या टोळीस अटक

गोल्ड तस्करीच्या गुन्ह्यांत चारजणांच्या एका टोळीला हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक केली.

Swapnil S

मुंबई : गोल्ड तस्करीच्या गुन्ह्यांत चारजणांच्या एका टोळीला हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक केली. या चौघांकडून या अधिकाऱ्यांनी सुमारे सव्वाचार किलो गोल्ड जप्त केले असून, त्याची किंमत एक कोटी बारा लाख रुपये इतकी आहे. अटकेनंतर या चौघांनाही लोकल कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. रियाधहून येणाऱ्या विमानातून कोट्यवधी रुपयांची गोल्ड तस्करी होणार असल्याची माहिती एआययूच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीनंतर या अधिकार्‍यांनी प्रत्येक प्रवाशांची झडती सुरू केली होती. यावेळी ग्रीन चॅनेलवरुन विमानतळाबाहेर जाणाऱ्या लाल सिंग आणि रतन खान या दोन प्रवाशांना या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. या दोघांकडून या अधिकाऱ्यांनी ४ किलो २७६ ग्रॅम वजनाचे गोल्ड सापडले. या गोल्डची किंमत एक कोटी बारा लाख रुपये आहे.

IIT मुंबईतील विद्यार्थ्याची आत्महत्या; परीक्षेत ChatGPT वापरल्याचा आरोप, प्रशासनाविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन

Ulhasnagar : धुक्याच्या आड रात्री ‘केमिकल गॅस’चा खेळ? उग्र वास अन् धुक्याची चादर; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Ganeshotsav 2026 : गणपतीच्या सजावटीत FDA ची झलक; तुकाराम मुंढेंच्या कामाला अनोख्या पद्धतीने सलाम, Video

Mumbai : ‘त्या’ फुटबॉल मैदानावर ‘एमएफए’चा अधिकार नाही; म्हाडाची उच्च न्यायालयात माहिती

Mumbai : पालिकेने SIR साठी मोजले १०.८१ कोटी रुपये; चार महिन्यांत १,३०४ डेटा एंट्री ऑपरेटरची नियुक्ती