मुंबई

दरोड्याच्या गुन्ह्यातील सातजणांच्या टोळीस अटक

वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले

नवशक्ती Web Desk

मुंबई : दरोड्याच्या गुन्ह्यातील सातजणांच्या एका टोळीला वाकोला पोलिसांनी अटक केली. ही टोळी स्पा सर्व्हिसच्या नावाने घातक शस्त्रांचा धाक दाखवून लुटमार करत असल्याचे तपासात उघडकीस आले असून, त्यांच्या अटकेने अशाच पाच गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. निलेश शिवकुमार सरोज, विशाल राजेश सिंग, आदित्य उमाशंकर सरोज, सुरेश रामकुमार सरोज, कुलदीप शेषनाथ सिंग, सुरेश रामसिंग विश्वकर्मा, सपोनकुमार अश्विनीकुमार शीट अशी या सातजणांची नावे आहते. या आरोपींकडून पोलिसांनी एक गावठी कट्टा, तीन जिवंत काडतुसे, दहा हजाराची कॅश आणि नऊ मोबाईल आदी मुद्देमाल जप्त केला आहे. अटकेनंतर या सातजणांना वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस