मुंबई

मुंबईत प्रदूषणवाढीचा अभ्यास करण्यासाठी प्रदूषण मापक यंत्राचा वापर होणार

प्रदूषण मापक यंत्र बसवण्यासाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून या कामासाठी तब्बल सहा कोटी रुपये खर्चणार आहे.

प्रतिनिधी

मुंबई प्रदूषणमुक्त करण्यासाठी मुंबई महापालिकेने प्रदूषणवाढीचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सहा ठिकाणी प्रदूषण मापक यंत्र बसवण्यात येणार असून, यंत्राच्या माध्यमातून अभ्यास करत प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करणार असल्याचे पर्यावरण विभागाचे उपायुक्त अतुल राव यांनी सांगितले. दरम्यान, सहा ठिकाणी प्रदूषण मापक यंत्र बसवण्यासाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून या कामासाठी तब्बल सहा कोटी रुपये खर्चणार आहे.

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रदूषणावर नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात मुंबईत कोरोनाचा शिरकाव त्यानंतर मुंबईतील प्रदूषणात घट झाली होती; परंतु लॉकडाऊनचे नियम शिथिल होताच पुन्हा प्रदूषणात वाढ झाल्याचे निष्कर्ष आवाज फाउंडेशनच्या अहवालातून समोर आला होता; परंतु आता मुंबई प्रदूषणमुक्त करण्यासाठी पालिका प्रशासनाने अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सहा कोटी रुपये खर्च करून सहा ठिकाणी सिस्टीम ऑफ एअर क्‍लालिटी अॅण्ड वेदर फॉरकास्टिंग अॅण्ड रिसर्च ही स्वयंचलित प्रदूषण मापक यंत्र बसवणार असल्याचे राव यांनी सांगितले.

दरम्यान, प्रदूषण मापक यंत्रामुळे प्रदूषण पातळीची नोंद अॅप्लिकेशनवरही उपलब्ध होणार आहे. भविष्यात ५५ ठिकाणी अशीच प्रदूषण मापके बसवणार असल्याचे ते म्हणाले.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री