मुंबई : बोरिवली येथे बबन राजाराम सुरवसे या ५५ वर्षांच्या रिक्षाचालकावर तीनजणांच्या एका टोळीने प्राणघातक हल्ला केला. हल्ल्यात जखमी झालेल्या बबन यांच्यावर शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी राकेशसह तीन आरोपीविरुद्ध कस्तुरबा मार्ग पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे. ड्रग्जच्या सेवनामुळे मुलाच्या झालेल्या मृत्यूस जबाबदार असलेल्या ड्रग्ज तस्कराविरुद्ध पोलिसांत तक्रार केली म्हणून हा हल्ला झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. बबन हे रिक्षाचालक म्हणून काम करतात. आरोपी राकेश हा याच परिसरात राहत असून, तो ड्रग्ज तस्करी करतो. त्याच्यामुळे तिचा भाऊ राजेशला ड्रग्ज पिण्याचे व्यसन लागले होते. त्यातच राजेशचा मृत्यू झाला होता. त्यामुळे राकेशविरुद्ध बबन हे नेहमी पोलिसांत तक्रार करत होते. त्याचा राग म्हणून बुधवारी दुपारी बारा वाजता बोरिवलीतील सुधीर फडके ब्रिजवर राकेशसह त्याच्या दोन सहकाऱ्यांनी बबन सुरवसे यांच्याशी वाद घालून त्यांना बेदम मारहाण मारहाण केली. तिक्ष्ण हत्याराने त्यांच्यावर वार केले होते. या हल्ल्यात ते गंभीररीत्या जखमी झाले होते.