मुंबई

शिल्पकार आशिष कुमार दास यांच्या मानवी मनांचे भाव उलगडणारे शिल्पप्रदर्शन

विविध कलाकृतीमध्ये 'लक्ष्यभेद', 'दशावतार', दि प्रेअँड दि प्रोटेक्टर',‘दि फेलीन प्रोव्हेस' 'दि इटर्नल बॉण्ड','बॅलन्स इन नेचर' वगैरेतून ह्या भावनिक वैविध्यपूर्ण अशा पैलूंचे कलात्मक दर्शन

देवांग भागवत

शिल्पकार आशिष कुमार दास यांच्या ब्रॉन्झमधील नवनिर्मित शिल्पकृतींचे एकल कलाप्रदर्शन मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरी येथे आयोजित करण्यात आले आहे. ११ ऑक्टोबरपासून सुरु होणारे हे प्रदर्शन १७ ऑक्टोबरपर्यंत रोज सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत रसिकांना विनामूल्य बघता येणार आहे. या प्रदर्शनात त्यांनी ठेवलेल्या अनेक लक्ष्यवेधी शिल्पकृती अनोख्या व कलात्मक आहेत. मानवी मनातील विविध भावनांचे अनेक पैलू त्यांनी शिल्पकृतीतून साकारले आहेत.

मूळचे पश्चिम बंगालमधील शिल्पकार दास याना कलाक्षेत्रात अनेक शिष्यवृत्ती व पुरस्कार मिळाले आहेत. मुंबई, नवी दिल्ली, कोलकाता, बंगलोर, वडोदरा वगैरे अनेक ठिकाणी सुप्रसिद्ध कलादालनात त्यांच्या शिल्पकृती एकल व सामूहिक प्रदर्शनात ठेवण्यात आल्या आहेत. अनेक भारतीय व विदेशी कलासंग्राहकांकडे त्यांच्या शिल्पकृती संग्रही आहेत. प्रस्तुत प्रदर्शनात त्यांनी ठेवलेल्या विविध कलाकृती कल्पक व कलात्मक आहेत. त्यांचे बालपण लहान गावात गेल्यामुळे तेथील निसर्गसान्निध्यातील शांत व रम्य वातावरण, लोक, त्यांची साधी राहणी व जीवनशैली, संस्कृतिमूल्ये, परंपरा व रूढी तसेच तेथील एकंदर राहणीमान व जनजीवनाचे विविध पैलूंचे ह्यांचा बराच अंशी पगडा त्यांच्या संवेदनशील मनात घर करून होता. याच राहणीमानाचे व संस्कृतीचे परिणाम त्यांनी आपल्या शिल्पकलेतून सादर केले आहेत. त्यांनी ठेवलेल्या विविध कलाकृतीमध्ये 'लक्ष्यभेद', 'दशावतार', दि प्रेअँड दि प्रोटेक्टर',‘दि फेलीन प्रोव्हेस' 'दि इटर्नल बॉण्ड','बॅलन्स इन नेचर' वगैरेतून ह्या भावनिक वैविध्यपूर्ण अशा पैलूंचे कलात्मक दर्शन सर्वांना घडते.

एकत्र आणणं माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं; राज ठाकरेंचा हल्लाबोल

''जर इथे येऊन धंदा करताय तर मराठी बोलायची लाज कसली?'' अभिनेते भरत जाधव यांचा संतप्त सवाल

गुजरातेत हिंदी सक्ती नसेल, तर ती महाराष्ट्रात कशासाठी? खासदार सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल

‘जय गुजरात’मुळे वादंग; अमित शहांपुढे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या घोषणेमुळे विरोधक संतप्त

हायकोर्टाची सुनावणी सोमवारपासून लाईव्ह; सुरुवातीला पाच न्यायमूर्तींचा समावेश