मुंबई

कौटुंबिक वादातून पत्नीला पेटवून दिले

पतीविरुद्ध नेहरुनगर पोलिसांनी हत्येचा प्रयत्नासह शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला

नवशक्ती Web Desk

कौटुंबिक वादानंतर विभक्त राहणाऱ्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्यावर पतीनेच पेट्रोल ओतून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना चुन्नाभट्टी परिससरात उघडकीस आली आहे. या घटनेत सरीता संजय ठाकूर ही महिला गंभीररीत्या भाजली असून, तिच्यावर शीव रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. याप्रकरणी संजय रमाकांत ठाकूर या पतीविरुद्ध नेहरुनगर पोलिसांनी हत्येचा प्रयत्नासह शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे.

ही घटना बुधवारी सकाळी साडेसात वाजता चुन्नाभट्टी येथील पूर्व दुतग्रती महामार्ग, सुमननगर बसस्थानकाजवळील अण्णाभाऊ साठे ब्रिजसमोर घडली. संजय हा गणपतीच्या मूर्त्या बनविण्याचे काम करत असून सध्या शीव-चुन्नाभट्टी, राहुलनगर परिसरात राहतो. त्याला मुलाची अपेक्षा असल्याने चार मुली झाल्याने सरीता आणि संजय यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून कौटुंबिक वाद सुरू होता. अनेकदा तो तिला मद्यप्राशन करून मारहाण करून जिवे मारण्याची धमकी देत होता. त्यामुळे सरीताने त्याच्याविरुद्ध आरसीएफ आणि वडाळा पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध दोन अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद केली होती.

संजयची समजूत काढून त्याच्या स्वभावात काहीच फरक पडला नव्हता. बुधवारी सकाळी साडेसात वाजता सरीता ही नेहमीप्रमाणे कामावर निघाली होती. यावेळी तिथे संजय आला आणि त्याने तिच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिले होते. त्यात ती गंभीररीत्या भाजली होती. त्यामुळे तिला तातडीने शीव रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तिथेच तिच्यावर अतिदक्षता उपचार सुरू आहे.

अटल पेन्शनचे केंद्रीकरण चिंताजनक; बँकांनी ग्राहकांना पेन्शन स्लॅबसाठी प्रवृत्त करावे - वित्तीय सेवा विभाग सचिव एम. नागराजू

मुंबईकरांसाठी खुशखबर! गोराईत महाराष्ट्रातील पहिल्या मँग्रोव्ह पार्कचं २८ मे रोजी उद्घाटन; पर्यावरण पर्यटनाला मिळणार चालना

Mumbai : वांद्र्यातील गरीब नगर पाडकाम ८५ टक्के पूर्ण; "मानवी दृष्टिकोन ठेवून कारवाई," पश्चिम रेल्वेचं स्पष्टीकरण

नवी मुंबईत ५०४ इमारती धोकादायक; ५२ इमारती अतिधोकादायक; विभागवार सर्वेक्षणानंतर यादी जाहीर

वाढत्या तापमानामुळे कांदा सडतोय; कांदा उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त