संग्राहित छायाचित्र 
मुंबई

"लाच घेण्यासाठी केलेला इशारा पुरावा होऊ शकत नाही"

पैसे मागण्यासाठी केलेले हातावारे हा लाचखोरीचा पुरावा होऊ शकत नाही...

Swapnil S

मुंबई : पैसे मागण्यासाठी केलेले हातावारे हा लाचखोरीचा पुरावा होऊ शकत नाही, असा निर्वाळा देत सत्र न्यायालयाने ‘एफडीए’मध्ये कार्यरत सरला खटावकर या अधिकारी महिलेला मोठा दिलासा दिला. विशेष सत्र न्यायाधीश निखिल मेहता यांनी सबळ पुराव्याअभावी खटावकर यांची दोन लाख रुपये लाच घेतल्याप्रकरणी १० वर्षानंतर निर्दोष मुक्तता केली. नगर येथील डेअरीमधील दूध जप्त केल्यानंतर पुढील कारवाईची धमकी देऊन २ लाख रुपयांची लाच मागण्यात आल्याचा आरोप करून नगरच्या पारनेर तालुक्यातील किसान कावड यांनी फेब्रुवारी २०१३ मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

न्यायालय म्हणते

  • आरोपीने पैसे मागताना केवळ हातवारे केले. अशाप्रकारे केवळ हातवारे करून केलेली पैशांची मागणी हा लाच मागितल्याचा पुरावा होऊ शकत नाही.

  • केवळ लाचेच्या रक्कमेची वसुली हासुद्धा लाच स्वीकारल्याच्या आरोपाचा पुरावा ठरणार नाही. रक्कम वसुलीच्या आधारे आरोपीचा गुन्ह्यातील सहभाग सिद्ध होत नाही.

  • एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून कारवाई केली. मात्र या कारवाईदरम्यान आरोपी अधिकारी महिलेने लाच मागितल्याचे सिद्ध होऊ शकत नाही.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

सावत्र भावांना बहिणींनी जोडा दाखवला - मुख्यमंत्री

तुष्टीकरणाला उत्तर कसे द्यायचे हे महाराष्ट्राने दाखवले - मोदी

भारतीय संघाची सामन्यावर पकड;जयस्वाल, राहुल यांची नाबाद अर्धशतके; बुमराच्या विकेटचे पंचक