मुंबई

गांजा दिला नाही म्हणून धक्काबुक्कीत पडून तरुणाचा मृत्यू

याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून आरोपी तृतीयपंथी सुमित्रा कंदस्वामी देवेंद्र ऊर्फ चिन्नी याला अटक केली.

नवशक्ती Web Desk

मुंबई : गांजा दिला नाही म्हणून शिवीगाळ करून धक्काबुक्कीत जमिनीवर पडल्याने आतिक अहमद जलील अहमद अन्सारी या ३४ वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून आरोपी तृतीयपंथी सुमित्रा कंदस्वामी देवेंद्र ऊर्फ चिन्नी याला अटक केली. वाहिद अहमद जलील अहमद अन्सारी हा गोवंडीतील शिवाजीनगर परिसरात राहतो. त्याचा आतिक हा भाऊ असून, त्याला गेल्या पाच वर्षांपासून ताडी व गांजा पिण्याचे व्यसन लागले होते. सोमवारी रात्री आतिक हा त्याचा तृतीयपंथी मित्र सुमित्रासोबत शिवाजीनगर, जुवेरिया ब्युटीपार्लरजवळ ताडी पिण्यासाठी बसले होते. यावेळी आतिकला ताडीमुळे प्रचंड नशा झाली होती. त्यामुळे त्याने सुमित्राला त्याला घरी सोडण्यास सांगितले. यावेळी सुमित्राने त्याच्याकडे गांजाची मागणी केली होती. त्याने गांजा देण्यास नकार दिला म्हणून त्यांच्यात वाद झाला होता. त्यातून त्याने त्याला शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली होती. त्यात तोल गेल्याने तो खाली पडला आणि बेशुद्ध झाला. त्याला स्थानिक रहिवाशांनी तातडीने जवळच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केले. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

निवडणुक प्रशिक्षणाला दांडी ठरू शकते महागात; EVM हाताळणीपासून मॉक पोलपर्यंत काटेकोर तयारी

मनरेगा बचावासाठी काँग्रेस सरसावली; ५ जानेवारीपासून देशव्यापी आंदोलन

'मनरेगा बंद करणे' हा लोकशाहीवरील हल्ला - राहुल गांधी

बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीची सुटका करून लावून दिला विवाह

चीनमध्ये वेगवान रेल्वेचा विश्वविक्रम; अवघ्या दोन सेकंदात ७०० किमी/प्रतितास चाचणी यशस्वी