मुंबई

अंगाडियाच्या मॅनेजरचे अपहरण; आरोपीला भोपाळ येथून अटक

सोन्याचे दागिने आणि कॅश असा मुद्देमाल घेऊन पळून गेला

नवशक्ती Web Desk

मुंबई : आर्थिक वादातून अंगाडियाच्या मॅनेजरचा अपहरणाचा प्रयत्न करून भुलेश्‍वर येथील कार्यालयात प्रवेश करून सुमारे ८५ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि कॅश असा मुद्देमाल घेऊन पळून गेलेल्या एका आरोपीला भोपाळ येथून गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. गौरव नवीनकुमार जैन असे या ४० वर्षीय आरोपीचे नाव असून तो मध्य प्रदेशच्या भोपाळ, पार्वतीनगरचा रहिवाशी आहे. त्याचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस येताच त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले. सध्या तो पोलीस कोठडी असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

मद्य परवान्यावरून सरकारचा सावध पवित्रा; विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय परवाने वाटप नाहीच -अजित पवार

अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज पृथ्वीकडे परतणार

जनसुरक्षा कायदा ‘अर्बन नक्सल’विरोधात उपयुक्त ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘फिल्डिंग’; काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच, 'ही' नावे चर्चेत