मुंबई

अबू आझमी यांची हायकोर्टात धाव; वादग्रस्त विधानप्रकरणी एफआयआर रद्द करण्याची विनंती

समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. औरंगजेबाचा उल्लेख करून वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी पोलिसांनी दाखल केलेले दोन एफआयआर रद्द करण्यात यावे, अशी विनंती आझमी यांनी याचिकेतून केली आहे. त्यांच्या याचिकेची सोमवारी न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठाने दखल घेतली आणि सुनावणी घेण्यास तयारी दर्शवली.

Swapnil S

मुंबई : समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. औरंगजेबाचा उल्लेख करून वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी पोलिसांनी दाखल केलेले दोन एफआयआर रद्द करण्यात यावे, अशी विनंती आझमी यांनी याचिकेतून केली आहे. त्यांच्या याचिकेची सोमवारी न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठाने दखल घेतली आणि सुनावणी घेण्यास तयारी दर्शवली.

दोन एफआयआर दाखल झाल्यानंतर अबू आझमी यांना मार्चमध्ये झालेल्या अधिवेशनावेळी निलंबित करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही एफआयआर रद्द करण्याची मागणी करीत आझमी यांनी वकील मुबिन सोलकर यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

आझमी हे मानखुर्द शिवाजी नगर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. मुघल सम्राट औरंगजेब यांचे कौतुक करणाऱ्या वक्तव्याबद्दल आझमी यांच्यावर मरीन ड्राइव्ह पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. ३ मार्च रोजी आझमी यांनी औरंगजेब यांना चांगला प्रशासक म्हटले. त्यावरून वादाला तोंड फुटले होते. जर औरंगजेबाने मंदिरे उद्ध्वस्त केली असतील तर त्यांनी मशिदी देखील उद्ध्वस्त केल्या होत्या, असे आजमी यांनी म्हटले होते. छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील संघर्षाचे चित्रण करणाऱ्या छावा चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या संदर्भात त्यांनी वादग्रस्त टिप्पणी केली होती.

गुजरातेत हिंदी सक्ती नसेल, तर ती महाराष्ट्रात कशासाठी? खासदार सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल

आज विजयी मेळावा; उद्धव-राज ठाकरे वरळीत एकाच मंचावर येणार

‘जय गुजरात’मुळे वादंग; अमित शहांपुढे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या घोषणेमुळे विरोधक संतप्त

हायकोर्टाची सुनावणी सोमवारपासून लाईव्ह; सुरुवातीला पाच न्यायमूर्तींचा समावेश

मथुरेची शाही ईदगाह मशीद वादग्रस्त संरचना नाही; अलाहाबाद उच्च न्यायालयाने हिंदू पक्षाची याचिका फेटाळली