मुंबई

गुंतवणुकीच्या नावाने फसवणूक करणाऱ्या आरोपीस अटक

भाजी विक्रीसह एलईडी ट्युबलाईट व्यवसायात गुंतवणुकीच्या नावाने फसवणूक करणाऱ्या इबाद अफसर बेग या आरोपीस दिडोंशी पोलिसांनी अटक केली.

Swapnil S

मुंबई : भाजी विक्रीसह एलईडी ट्युबलाईट व्यवसायात गुंतवणुकीच्या नावाने फसवणूक करणाऱ्या इबाद अफसर बेग या आरोपीस दिडोंशी पोलिसांनी अटक केली. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. यातील तक्रारदार अंधेरी येथे राहत असून एका मॉलमध्ये कामाला आहे. याच ठिकाणी त्यांची इबादशी ओळख झाली होती. भाजी विक्रीसह एलईडी ट्युबलाईट व्यवसायात चांगला फायदा असल्याचे इबादने त्यांना पार्टनरशीप ऑफर केली होती. व्यवसायासाठी त्याने त्याला १६ लाख १० हजार रुपये दिले होते. मात्र या पैशांचा परस्पर अपहार करून त्यांची सुमारे १७.५० लाखांची फसवणूक केली होती.

Maratha Reservation : ''मराठा-कुणबी एकच, जीआरशिवाय उपोषण थांबणार नाही''; शिंदे समितीशी चर्चा : मनोज जरांगे ठाम

Maratha Reservation : शिंदे समितीची मनोज जरांगे यांच्याशी चर्चा; मराठा आरक्षणावर निर्णायक टप्पा?

Maratha Reservation : मराठा वादळाने मुंबईला हादरा; आता माघार नाही – मनोज जरांगेंचा निर्धार; पावसामुळे आंदोलकांचे प्रचंड हाल

मुंबईला पावसाने झोडपले; पुढील तीन दिवस मध्यम पावसाची शक्यता

महायुतीच्या घोडचुकीमुळे मुंबईकर वेठीस; मराठा आंदोलनामुळे मुंबईत गोंधळाची स्थिती