मुंबई

आरोपी हितेशने देढियाला १० कोटी दिले

न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेत 122 कोटींच्या घोटाळ्यात एक महत्त्वपूर्ण घडामोड समोर आली आहे.

Swapnil S

पूनम अपराज / मुंबई

न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेत 122 कोटींच्या घोटाळ्यात एक महत्त्वपूर्ण घडामोड समोर आली आहे. या घोटाळ्यातील आरोपी आणि माजी जनरल मॅनेजर हितेश मेहता याने चोरी झालेल्या रकमेतून 10 कोटी रुपये कंत्राटदार कपिल देढिया याला दिले. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या (EOW) तपासात ही माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, आर्थिक गुन्हे शाखेने देढिया याला आरोपी ठरविले आहे आणि त्याच्याविरोधात लुकआउट सर्क्युलर (LOC) जारी केले आहे. EOW ने बँकेच्या सहा संचालकांची चौकशी केली, परंतु गौरी भानु उपस्थित होऊ शकले नाही.

EOW सूत्रांनुसार, मेहता आणि देढिया हे चांगले परिचित होते आणि दोघेही दहिसर येथील एकाच इमारतीत राहत होते. तपासातून असे दिसून आले की, मेहता ने देढिया याला मनी लॉंडरिंग करण्यासाठी पैसे दिले, ज्यामध्ये त्याला मोठे कमिशन मिळाले. देढियाने कथितपणे काळा पैसा पांढरा केला, त्याचे कमिशन घेतले आणि उर्वरित रक्कम मेहता याला परत केली. दरम्यान, पोलीस अद्याप तपास करत आहे की 10 कोटींपैकी किती रक्कम प्रत्यक्षात मेहता याला परत केली गेली. या तपासाच्या आधारावर, पोलिसांनी आता देढिया याला आरोपी केले आहे आणि त्याच्याविरोधात लुकआउट सर्क्युलर (LOC) जारी केले आहे.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक