मुंबई

हिरे फसवुणकीच्या गुन्ह्यातील आरोपीस सात वर्षांनी अटक

या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. भोलाप्रसादने स्वत:च्या अस्तिस्तावाचे सर्व पुरावे नष्ट करून मुंबईतून पलायन केले होते. त्यामुळे या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास हाती येताच पोलिसांनी भोलाप्रसादचा शोध सुरू केला होता.

Swapnil S

मुंबई : हिरे फसवणुकीच्या गुन्ह्यातील एका आरोपीस सात वर्षांनी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी उत्तर प्रदेशातून अटक केली. भोलाप्रसाद वर्मा असे या आरोपीचे नाव आहे. २०१७ साली भोलाप्रसादने एका हिरे व्यापाऱ्याकडून सुमारे २७ लाख रुपयांचे हिरे क्रेडिटवर घेतले होते; मात्र दिलेल्या मुदतीत हिरे किंवा हिऱ्याच्या विक्रीतून आलेले पेमेंट दिले नव्हते. या घटनेनंतर तो पळून गेला होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध तक्रारदार व्यापाऱ्याने बीकेसी पोलिसांत तक्रार केली होती.

या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. भोलाप्रसादने स्वत:च्या अस्तिस्तावाचे सर्व पुरावे नष्ट करून मुंबईतून पलायन केले होते. त्यामुळे या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास हाती येताच पोलिसांनी भोलाप्रसादचा शोध सुरू केला होता. ही शोधमोहीम सुरू असताना तो उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर एसीपी महेश देसाई, प्रभारी पोलीस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे यांच्या पथकातील एपीआय राहुल प्रभू, विकास मोरे, यादव यांनी उत्तर प्रदेशात जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने भोलाप्रसादला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत फसवणुकीच्या गुन्ह्यातील तो आरोपी असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्याला अटक करून पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. याच गुन्ह्यात तो सध्या पोलीस कोठडीत असून, त्याची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. त्याने अशाच प्रकारे इतर काही हिरे व्यापाऱ्यांची फसवणूक केली आहे का, याचा पोलीस तपास करत आहेत.

मुंबईत घरांवर पहिला हक्क मराठी माणसाचा! घर नाकारणाऱ्या बिल्डरवर होणार कारवाई; शंभूराज देसाई यांची घोषणा

अचानक हार्ट अटॅकची भीती; कर्नाटकमध्ये रुग्णालयांत लोकांची प्रचंड गर्दी, घाबरू नका - डॉक्टरांचे आवाहन

महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या समावेशाकडे लागले लक्ष... युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू

IND vs ENG 2025 : क्रिकेटच्या पंढरीत भारताची कसोटी! लॉर्ड्स स्टेडियमवर आजपासून तिसरा सामना, मालिकेत आघाडी घेण्याचे लक्ष्य

लैंगिक छळाच्या तक्रारीनंतर केलेली बदली रद्द; सहाय्यक प्राध्यापक महिलेला उच्च न्यायालयाचा दिलासा