ANI
ANI
मुंबई

२ वर्षात विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्या तब्ब्ल १ लाख २९ वाहनचालकांवर कारवाई 

देवांग भागवत

वाहतुकीचे नियम सर्रास धाब्यावर बसवणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांकडून कठोर कारवाई मागील काही दिवसांपासून करण्यात येत आहे. यामध्ये एकदिशा मार्गावर विरुद्ध दिशेने वाहन चालवून नियम पायदळी तुडवणाऱ्या वाहनचालकांची संख्या सर्वाधिक आहे. वाहतूक पोलिसांनी मागील २ वर्षात अशा  विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्या बेशिस्त १ लाख २९ वाहनचालकांवर कारवाई केल्याची माहिती वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली आहे. 

मुंबईसह अन्य शहरात दुचाकीस्वार आणि मागे बसलेल्या व्यक्तीसाठीही जून महिन्यापासून हेल्मेटसक्ती करण्यात आलेली आहे. याशिवाय वाहन चालवताना आवश्यक नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई देखील करण्यात येत आहे. मात्र या नियमांना दुचाकीस्वारांकडून केराची टोपली दाखवण्यात येत आहे. अद्याप हेल्मेटबाबत गांभीर्य आले नसून एकदिशा मार्गावर देखील दुचाकीस्वार सर्रास विरुद्ध दिशेने ये-जा करत असल्याचे निदर्शनास आले आहे. एकदिशा मार्गावर विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्यांमुळे अपघात होण्याची शक्यता सर्वाधिक असते. सर्वोच्च न्यायालयाने २०१९ मध्ये या प्रकाराची दखल घेतली होती. वाहतुकीचा हा नियम मोडणाऱ्या चालकांविरूद्ध दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. याच पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी कठोर पावले उचलत जानेवारी २०२० ते जून २०२२ या कालावधीत विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्या बेशिस्त १ लाख २९ वाहनचालकांवर कारवाई केली आहे.

अमित शहांच्या भाषणाचा एडिट केलेला व्हिडिओ व्हायरल, FIR दाखल

विनातिकिट प्रवास हा गुन्हाच- हायकोर्ट; उच्चपदस्थ अधिकाऱ्याला तूर्तास दिलासा

माढ्यात फडणवीसांनीही टाकला डाव; अभिजित पाटील, धवलसिंह भाजपच्या गळाला?

दक्षिण भारतात पाण्याची भीषण टंचाई, केवळ १७ टक्के जलसाठा; महाराष्ट्र, गुजरातमध्येही परिस्थिती भीषण

आज पनवेल, कल्याण, अंबरनाथ तापणार; ४४ अंश तापमानाचा अंदाज