मुंबई

नो हाँकिंग डे मोहीमे अंतर्गत २११६ वाहनचालकावर कारवाई

दोन दिवसांपूर्वी वाहतूक पोलिसांकडून विविध गर्दीच्या चौकांमध्ये आवाजाच्या तीव्रतेचे मोजमाप करण्यात आले

नवशक्ती Web Desk

नो हॉकिंग डे मोहीमेअंतर्गत वाहतूक पोलिसांनी बुधवारी दिवसभरात २ हजार ११६ वाहनचालकांविरुद्ध कारवाई केली. वातावरणातील ध्वनी प्रदूषणाची तीव्रता कमी करण्यासाठी आगामी दिवसांत अशाप्रकारे नो हाँकिंग डे मोहीम राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. बुधवारी १४ जूनला मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण शाखेकडून मुंबई शहरात ध्वनीप्रदूषण आणि वाहन चालकांमधील विनाकारण हॉर्न वाजविण्याची प्रवृत्ती कमी करण्यासाठी नो हाँकिंग डे मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. काही सामाजिक संस्था, शाळा आणि समाजसेवकांनी मुंबई पोलिसांच्या या मोहिमेत मोठ्या संख्येने भाग घेतला होता. त्यांच्या मदतीने वाहतूक पोलिसांनी चौकाचौकात ‘नो हाँकिंग डे’च्या संदेशाचे फलक प्रदर्शित केले होते.

दोन दिवसांपूर्वी वाहतूक पोलिसांकडून विविध गर्दीच्या चौकांमध्ये आवाजाच्या तीव्रतेचे मोजमाप करण्यात आले. त्यात काही वाहनचालकांकडून पोलिसांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे बुधवारी रस्त्यावरील हॉर्नच्या आवाजाची तीव्रता कमी प्रमाणात झाल्याचे आढळून आले होते. मात्र काही वाहनचालकांनी विनाकारण हॉर्न वाजवण्याची प्रकृती कायम ठेवल्याचे दिसून आले. अशा २ हजार ११६ वाहनचालकांविरुद्ध पोलिसंनी कारवाई केली होती. त्यांच्याविरुद्ध मोटार वाहन कायदा कलम १९४ एफ नुसार ई-चलन कारवाई करण्यात आली होती.

आजचे राशिभविष्य, २८ सप्टेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Mumbai : दांडिया प्रेमींसाठी खुशखबर! शेवटचे ३ दिवस मध्यरात्रीपर्यंत खेळता येणार गरबा; पण 'हे' नियम पाळावे लागणार

"हास्यास्पद नाटकं करून सत्य लपवता येत नाही"; संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तानवर भारताचा घणाघात

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; हवामान खात्याचा इशारा

गायक झुबीन गर्ग मृत्यू प्रकरण : आयोजक व मॅनेजरवर लुकआउट नोटीस जारी; मुख्यमंत्री सरमा म्हणाले, अन्यथा...