मुंबई

Bigg Boss मध्ये प्रवेशाच्या बहाण्याने अभिनेत्रीची २. १० लाखांना फसवणूक, पोलिसांत केली तक्रार

जानेवारीत सोशल मीडियावर तिला एक मेसेज प्राप्त झाला होता. त्यात बिग बॉसमध्ये प्रवेश मिळविण्याची संधी असा मजकूर होता.

Swapnil S

मुंबई : बिग बॉस मालिकेत प्रवेश देण्याच्या बहाण्याने एका ५० वर्षांच्या अभिनेत्रीची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध वर्सोवा पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. या गुन्ह्याचा सायबर सेल पोलिसांकडून संमातर तपास सुरू आहे.

कविता विरमानी असे तक्रारदार अभिनेत्रीचे नाव असल्याचे समजते. ती अंधेरीतील चारबंगला, म्हाडा परिसरात राहते. ती अभिनय क्षेत्रात काम करते. जानेवारीत सोशल मीडियावर तिला एक मेसेज प्राप्त झाला होता. त्यात बिग बॉसमध्ये प्रवेश मिळविण्याची संधी असा मजकूर दिला होता. त्याखाली मोबाईल क्रमांक दिले होते. तिने तिथे संपर्क साधला असता समोरील व्यक्तीने तिला बिग बॉसमध्ये प्रवेश देण्याचे आश्‍वासन दिले होते. १२ ते २६ जानेवारी या कालावधीत त्याने तिला वेगवेगळ्या बँक खात्यात पैसे भरण्यास प्रवृत्त केले होते. त्याच्यावर विश्‍वास ठेवून तिनेही त्याला दोन लाख दहा हजार रुपये पाठवून दिले होते.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत