मुंबई

अभिनेते राकेश रोशन यांची फसवणूक

तोतया सीबीआय अधिकाऱ्यांना हायकोर्टाची नोटिस

नवशक्ती Web Desk

मुंबई : १२ वर्षांपूर्वी सीबीआय अधिकारी असल्याचे सांगून बॉलिवूड अभिनेते राकेश रोशन यांची तब्बल ५० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई हायकोर्टाने सोमवारी दोघा तोतया अधिकाऱ्यांना नोटीस बजावली. न्यायमूर्ती पी. डी. नाईक यांनी सुनावणीदरम्यान दोन्ही आरोपींच्या वतीने वकील हजर नसल्याने त्याची गंभीर दखल घेत आरोपींना नोटीस जारी करत पुढील सुनावणीवेळी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले.

राकेश रोशन यांच्या घरी मे २०११ मध्ये आलेल्या दोन व्यक्तींनी सीबीआयचे अधिकारी असल्याचे सांगून ५० लाख रुपयांची फसवणूक केली होती. राकेश रोशन यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी या दोघांविरुद्धात एसीबीकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे ऑगस्ट २०११ मध्ये एफआयआर दाखल करून दोघाही तोतया आरोपींना अटक केली. दरम्यान, तपास यंत्रणेने सोने आणि रोख रक्कम जप्त केली. ३० ऑक्टोबर २०१२ रोजी राकेश रोशन यांनी कनिष्ठ न्यायालयात अर्ज केला आणि आरोपींकडून जप्त केलेल्या रोख रक्कमेमधून ३० लाख रुपये परत मिळवले.

उर्वरित २० लाखांच्या रकमेसाठी राकेश रोशन यांनी हायकोर्टात धाव घेऊन याचिका दाखल केली. या याचिकेवर सोमवारी न्यायमूर्ती पी. डी. नाईक यांच्यापुढे सुनावणी झाली. यावेळी राकेश रोशन यांच्या वतीने अ‍ॅड. प्रसन्न भंगाळे आणि सीबीआयच्या वतीने अ‍ॅड. भरत मिरचंदानी हजर होते. परंतु दोघा आरोपींच्या वतीने कोणीही वकील उपस्थित नसल्याने न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत दोन्ही आरोपींना २१ ऑगस्टच्या पुढील सुनावणीवेळी वकिलांना हजर करण्याची नोटीस बजावली.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत