अदानी एअरपोर्टवर एआय सुविधा; 'एआयओएनओएस'शी धोरणात्मक करार 
मुंबई

अदानी एअरपोर्टवर एआय सुविधा; 'एआयओएनओएस'शी धोरणात्मक करार

अदानी एंटरप्रायझेसची उपकंपनी असलेल्या अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेड (एएएचएल) ने कंपनी ए. आय. क्षेत्रातील आघाडीची जागतिक कंपनी 'एआयओएनओएस' शी महत्त्वाचा करार केला आहे. याद्वारे एआय प्रणित बहुभाषिक चॅनलच्या माध्यमातून प्रवाशांना प्रवासी सहाय्यता कक्षामार्फत वैयक्तिक अनुभव मिळेल.

Swapnil S

मुंबई : अदानी एंटरप्रायझेसची उपकंपनी असलेल्या अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेड (एएएचएल) ने कंपनी ए. आय. क्षेत्रातील आघाडीची जागतिक कंपनी 'एआयओएनओएस' शी महत्त्वाचा करार केला आहे. याद्वारे एआय प्रणित बहुभाषिक चॅनलच्या माध्यमातून प्रवाशांना प्रवासी सहाय्यता कक्षामार्फत वैयक्तिक अनुभव मिळेल.

अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेड ही खासगी-सार्वजनिक भागीदारीमार्फत विमानतळांचे परिचलन करणारी देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. या नव्या सेवेच्या माध्यमातून अदानी विमानतळांवर सर्वच संपर्क माध्यमातून सतत माहिती घेता येईलच, पण प्रवाशांना यापूर्वी कधीही मिळाला नसेल असा सहाय्याचा स्वतंत्र वैयक्तिक अनुभव अनेक भाषांमधून मिळेल.

या सहकार्याच्या माध्यमातून ए.आय.ओ.एन.ओ.एस. तर्फे त्यांची आधुनिक एआय प्रणाली इंटेलिमेट येथे आणली जाईल. त्याद्वारे एआय आणि यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून अदानी एअरपोर्ट, विविध केंद्रांमधून आपले ग्राहक आणि कर्मचारी यांच्याशी थेट संभाषण, वेबसाइट, चॅट किंवा मोबाईल दूरध्वनी या माध्यमातून त्यांना हव्या असलेल्या भाषेत संपर्कात राहू शकेल.

प्रवाशांना मिळणार सेवांची माहिती

एआय चलित ही व्यवस्था प्रवाशांचा स्मार्ट सहाय्यक म्हणून २४ तास कार्यरत राहील. त्यामुळे प्रवाशांना आपल्या विमान उड्डाणाची स्थिती, कोणत्या गेटवरून विमानात जायचे ती माहिती, आपल्या बॅगची स्थिती, अन्य सूचना आणि विमानतळावरील अन्य सेवा, यांची माहिती इंग्रजी, हिंदी आणि अन्य विविध प्रादेशिक भाषांमध्ये तत्काळ मिळेल.

पावसाचा आणखी आठवडाभर मुक्काम; भारतीय हवामान खात्याचा अंदाज

नागपूर येथील विधान भवन, रवि भवनचे काम रखडले; थकीत रकमेमुळे कंत्राटदारांचा कामावर बहिष्कार

आठ महिन्यांच्या गरोदर तलाठीची शेतकऱ्यांसाठी धाव; शेताच्या बांधावर जाऊन केले पंचनामे

शुद्ध सांडपाण्याचा वापर बंधनकारक होणार; राज्य सरकारचे धोरण जाहीर

बळीराजावरील अरिष्ट दूर कर! उपमुख्यमंत्री शिंदेंचे पांडुरंगाला साकडे; नांदेडचे रामराव आणि सुशिलाबाई वालेगावकर यांनाही महापूजेचा मान