Mumbai : एअर इंडिया इमारतीला मिळणार नवी झळाळी; नूतनीकरणासाठी १८१ कोटी मंजूर 
मुंबई

Mumbai : एअर इंडिया इमारतीला मिळणार नवी झळाळी; नूतनीकरणासाठी १८१ कोटी मंजूर

नरिमन पॉईंट येथील एअर इंडियाची इमारत ताब्यात घेतल्यानंतर राज्य सरकारने इमारतीच्या नूतनी-करणासाठी १८१ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे.

Swapnil S

मुंबई : नरिमन पॉईंट येथील एअर इंडियाची इमारत ताब्यात घेतल्यानंतर राज्य सरकारने इमारतीच्या नूतनी-करणासाठी १८१ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. या निधीतून इमारतीच्या संरचनात्मक दुरुस्तीसोब-तच नूतनीकरण आणि विद्युतीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे एअर इंडिया इमारतीला लवकरच नवा चेहरा मिळेल.

मंत्रालयापासून हाकेच्या अंतरावर असलेली २३ मजली एअर इंडिया इमारत राज्य सरकारने नुकतीच १ हजार ६०१ कोटी रुपये मोजून खरेदी केली. इमारतीची खरेदी प्रक्रिया पूर्ण होऊन इमारत ताब्यात आल्यानंतर सरकारने इमारतीची संरचनात्मक दुरुस्ती, नूतनीकरण आणि विद्युतीकरणाच्या कामाची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपवली आहे. त्यासाठी विभागाने तयार केलेल्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळून वित्त विभागाने निधी मंजूर केल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव आबासाहेब नागरगोजे यांनी दिली.

दोन स्वतंत्र निविदा काढणार

एअर इंडिया इमारतीसाठी स्थापत्य आणि विद्युतीकरण अशा दोन स्वतंत्र निविदा काढण्यात येतील. निविदा काढण्याची प्रक्रिया सध्या सुरू असून इमारत नूतनीकर-णाचे काम सहा महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहे. स्थापत्य कामात इमारतीची दुरुस्ती, सजावट, नवे फर्निचर आणि रंगरगोटीचा समावेश आहे. तर विद्युतीक-रणात नव्या लिफ्ट, विद्युत उपकरणे बसवणे यांचा समावेश असल्याचे नागरगोजे यांनी स्पष्ट केले.

सल्लागार म्हणून वास्तुविशारदाची नेमणूक

एअर इंडिया इमारतीच्या नूतनीकरणासाठी राष्ट्रीय स्तरावरील वास्तुविशारदाची सल्लागार म्हणून नेमणूक केली जाणार आहे. इमारतीत बसवण्यात येणारी विद्युत उपकरणे अत्युच्च दर्जाची आणि नामांकित कंपन्यांची असतील. विद्युत उपकरणांची देखभाल दुरुस्ती किमान पाच वर्षे मूळ निर्माता कंपनीकडून करून घ्यावी तसेच दुरुस्ती आणि नूतनीकरणाच्या कामाचा दोषदायित्व कालावधी किमान पाच वर्षांचा असावा, असे यासंदर्भात जारी केलेल्या शासन निर्णयात नमूद केले आहे.

३४ कोटी ७६ लाख ३१ हजार रुपये खर्च

या नूतनीकरण मोहिमेत इमारतीचे मजबुतीकरण, दुरुस्ती आणि अंतर्गत सजावटीसाठी ७५ कोटी ३२ लाख ५७ हजार रुपये खर्च केले जाणार आहेत. तर संपूर्ण विद्युतीकरण आणि नव्या लिफ्टसाठी ७० कोटी ९२ लाख २३ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय वास्तुविशारद, सल्लागार शुल्क आणि जीएसटी मिळून ३४ कोटी ७६ लाख ३१ हजार रुपये खर्च होणार आहेत.

Mumbai : उच्च न्यायालयातील कॅन्टिनवर FDA चा बडगा; FSSAI परवाना नसल्याचे उघड

ॲग्रीगेटर कंपन्यांना १ सप्टेंबरपर्यंतची मुदत; नोंदणी न केल्यास कठोर कारवाई

E20 च्या वापराने मायलेज घटण्याचा संभव; केंद्र सरकारची संसदेत कबुली

जागतिक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या अध्यक्षतेखाली 'सीसीएस'ची बैठक; पुरवठा साखळीवरील संकटावर मंथन

गंभीर नियमभंग असेल तरच होते कारवाई, "मी स्वतःला सिंघम मानत नाही"; FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांची विशेष मुलाखत