मुंबई

अहमदाबादवरुन व्हिएतनामला विमानसेवा सुरू

आता भारतातून व्हिएतनामला जाण्यासाठी १७ थेट विमानसेवा उपलब्ध झाल्या आहेत.

प्रतिनिधी

व्हिएतनामची विमान कंपनी व्हिएतजेटने अहमदाबादापासून व्हिएतनाममधील हनोई आणि हो ची मिन्ह सिटी (सायगाव) या शहरांसाठी दोन नवीन हवाई फेऱ्या ३० सप्टेंबरपासून सुरु केल्या आहेत.

या फेऱ्या मंगळवार, गुरुवार, शनिवार व रविवार परतीच्या फेऱ्यासह असतील. यामुळे गुजरातमधील भारतीय पर्यटकांना व्हिएतनाममधील पर्यटनानाच आनंद घेणे सुकर होणशर आहे. आता भारतातून व्हिएतनामला जाण्यासाठी १७ थेट विमानसेवा उपलब्ध झाल्या आहेत. www.vietjetair.com या बेबसाईटवर व अन्य सेवांवर ही तिकिटे उपलब्ध होतील.

‘मंडे सेल’ सुरु

आगामी सणासुदीच्या सुट्ट्या लक्षात घेऊन व्हिएतजेटने ‘मंडे सेल’ जाहीर केला आहे. भारतीय पर्यटकांना आंतरराष्ट्रीय मार्गावरील बुकिंगसाठी २० टक्के सवलत मिळणार आहे. हा सेल १९ डिसेंबर २०२२पर्यंत चालू राहणार असून ‘हॅलोव्हिएतनाम’ हा प्रमोशन कोड त्यासाठी वापरावा लागणार आहे. जे प्रवासी १० ऑक्टोबर ते १८ सप्टेंबर २०२३ दरम्यान प्रवास करणार आहेत. त्यांना‘फ्लाय नाऊ, पे लॅटर’ ही सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

नवविवाहितांसाठी ‘लव्हस्टोरी’ स्पर्धा

भारतातील नवविवाहित जोडप्यांसाठी आपली ‘लव्हस्टोरी’ सांगण्याची स्पर्धा व्हिएतनामची विमान कंपनी व्हिएतजेटने आयोजित केली आहे. ही स्पर्धा ३० नोव्हेंबरपर्यंत सुरु राहील. त्यासाठी १५ ऑक्टोबरपर्यंत loveconnection.vietjetair.com या वेबासाईटवर नोंदणी करायची असून नवविवाहितांना विवाहापर्यंतची ‘लव्हस्टोरी’ कथन करायची आहे. ज्या लव्हस्टोरीला सर्वाधिक मते मिळतील त्यांना मुंबईतील समारंभासही उपस्थित राहता येणार आहे. सर्वात उत्कृष्ट लव्हस्टोरी कथन करणाऱ्या हनिमून पॅकेज मिळेल. विजेत्यांना हनिमून पॅकेज बक्षीस म्हणून व्हिएतनाममधील द नांग व फू कोक या पांढऱ्या वाळूच्या निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यावर अलिशान हॉटेलमध्ये राहण्याची संधी मिळणार आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी