'धुरंधर' अक्षय खन्नाला नोटीस; 'दृश्यम ३'मधील कराराचा केला भंग 
मुंबई

'धुरंधर' अक्षय खन्नाला नोटीस; 'दृश्यम ३'मधील कराराचा केला भंग

आगामी 'दृश्यम ३' या चित्रपटासाठी केलेल्या कराराचा भंग केल्याप्रकरणी अभिनेता अक्षय खन्ना याला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आल्याचे चित्रपट निर्माते कुमार मंगत पाठक यांनी शनिवारी सांगितले. एका मजकूर संदेशाद्वारे (टेक्स्ट मेसेज) “मी हा चित्रपट करत नाही," असे कळवत खन्नाने चित्रपटातून माघार घेतल्याचा आरोप त्यांनी केला.

Swapnil S

मुंबई : आगामी 'दृश्यम ३' या चित्रपटासाठी केलेल्या कराराचा भंग केल्याप्रकरणी अभिनेता अक्षय खन्ना याला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आल्याचे चित्रपट निर्माते कुमार मंगत पाठक यांनी शनिवारी सांगितले. एका मजकूर संदेशाद्वारे (टेक्स्ट मेसेज) “मी हा चित्रपट करत नाही," असे कळवत खन्नाने चित्रपटातून माघार घेतल्याचा आरोप त्यांनी केला.

मंगत पाठक यांनी सांगितले की, गेल्या महिन्यात 'दृश्यम ३' साठी अक्षय खन्नासोबत करार करण्यात आला होता आणि त्यांना अॅडव्हान्स रक्कमही देण्यात आली होती. मात्र, चित्रीकरणावर परिणाम होऊ लागल्याने शुक्रवारी जयदीप अहलावत यांना साइन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

अभिषेक पाठक लिखित दिग्दर्शित असलेला हा चित्रपट स्टार स्टुडिओ १८ सादर करत असून, आलोक जैन, अजित अंधारे, कुमार मंगत पाठक आणि अभिषेक पाठक हे त्याचे निर्मात आहेत.

अक्षय खन्नाने चित्रपट साइन करण्यापूर्वी त्याच्या लूकबाबतही दीर्घ चर्चा झाली होती. चित्रपटातील त्याच्या लूकवर आमच्यात बराच खल झाला. तो विग घालू इच्छित होता. मात्र आम्ही अचानक त्याच्या पात्राला नवा लूक दिल्यास तो अस्सल वाटणार नाही, असे त्याला सांगितले. अखेर त्याने ते मान्य केले आणि अलिबागमधील त्याच्या फार्महाऊसमध्ये करार झाला.
कुमार मंगत पाठक, निर्माता

'ओमकारा', 'नो स्मोकिंग' आणि 'सेक्शन ३७५' सारख्या चित्रपटांचे निर्माते असलेल्या मंगत पाठक यांनी पीटीआयला सांगितले, "आम्ही 'दृश्यम ३'वर गेली दोन वर्षे काम करत होतो आणि अक्षयला याची पूर्ण कल्पना होती.

BMC निवडणुकीसाठी काँग्रेस-वंचितचं ठरलं! दोन्ही पक्षांची युती जाहीर, जागावाटपही निश्चित

Mumbai : १० कोटींच्या खंडणी प्रकरणात मोठा खुलासा; २ महिलांना पोलीस कोठडी, मराठी अभिनेत्रीचाही सहभाग

"धमकीची माहिती देऊनही..." ; खोपोलीतील मंगेश काळोखेंच्या हत्याप्रकरणी नातेवाईकांचा गंभीर आरोप

खोपोलीतील मंगेश काळोखेंच्या हत्येचा थरार; धक्कादायक CCTV फुटेज व्हायरल

'पटक पटक के मारुंगा…' एपी ढिल्लोंच्या कॉन्सर्टला जाणाऱ्या प्रवासी महिलेला ऑटोचालकाकडून धमकी; Video व्हायरल