अलेक्झांड्रा थिएटरचे आरक्षण रद्द करण्यास विरोध; आरक्षण हटवल्यास तसा पायंडा पडण्याची विरोधकांची भीती प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

अलेक्झांड्रा थिएटरचे आरक्षण रद्द करण्यास विरोध; आरक्षण हटवल्यास तसा पायंडा पडण्याची विरोधकांची भीती

भायखळा येथील १,००५.०३ चौरस मीटर जागेवर असलेल्या अलेक्झांड्रा थिएटरचे आरक्षण रद्द करून ती जागा निवासी वापरासाठी खुली करण्याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सुधार समितीने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.

शेफाली परब-पंडित

मुंबई : भायखळा येथील १,००५.०३ चौरस मीटर जागेवर असलेल्या अलेक्झांड्रा थिएटरचे आरक्षण रद्द करून ती जागा निवासी वापरासाठी खुली करण्याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सुधार समितीने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. या पार्श्वभूमीवर, काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने तीव्र इशारा दिला आहे. मुंबईच्या विकास नियोजन प्रारुपा अंतर्गत ३,०९,२८४.०८ चौरस मीटर जागेवर तब्बल ११९ चित्रपटगृहांची आरक्षणे आहेत.

अशा वेळी एका बंद पडलेल्या चित्रपटगृहाचे आरक्षण रद्द केल्यास इतर बंद चित्रपटगृहांचे मालकही अशाच प्रकारची मागणी करतील, अशी भीती विरोधकांनी व्यक्त केली आहे. सुधार समितीसमोर १२ ऑगस्टला मांडण्यात आलेला हा प्रस्ताव विरोधकांच्या आक्षेपानंतर प्रलंबित ठेवण्यात आला होता.

मात्र, तो पुढील बैठकीत पुन्हा येण्याची शक्यता आहे. सुधार समितीच्या अध्यक्ष संध्या दोशी यांना लिहिलेल्या पत्रात काँग्रेसच्या नगरसेविका आणि समिती सदस्य मेहेर हैदर यांनी या निर्णयावर सवाल उपस्थित केला आहे. त्यांच्या मते, एका जीर्ण इमारतीची पुनर्रचना केली जाऊ शकते आणि बंद पडलेले चित्रपटगृह आधुनिक करून पुन्हा सुरू केले जाऊ शकते, तर मग आरक्षण पूर्णपणे रद्द करून निवासी विकासाचा मार्ग मोकळा का केला जात आहे, असा जोरदार सवाल केला आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

टॅक्सी, रिक्षाचालकांची याचिका निकाली; मराठी शिकण्यासाठी सरकारने वर्षभराची मुदत दिल्याचे न्यायालयाचे मत

Mumbai : स्थानकांवर थुंकल्यास हजार रुपये दंड; न भरल्यास प्रवाशाला न्यायालयात उभे करणार

मुद्रांक कायद्यातील मुदतीबाबत तिढा; प्रकरण मुख्य न्यायमूर्तीच्या खंडपीठाकडे वर्ग

'समृद्धी' महामार्गावर दरोडा! गाडी थांबवून वकिलाला लुटले; कुटुंबाला मारहाण करत १८ लाखांचे सोन्याचे दागिने, रोकड पळवली

यंदाची यूएस ओपन जिंकणार कोण? हंगामातील अखेरची ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा आजपासून