BEST 
मुंबई

रात्री द्यायचीये गणपती मंडळांना भेट? बेस्टची गणेशोत्सवात रात्रभर विशेष बससेवा

मुंबईत गणेशोत्सवाच्या काळात भाविक तसेच पर्यटकांना वेगवेगळ्या ठिकाणी गणपती मंडळांना भेट देता यावी, या उद्देशाने बेस्टतर्फे रात्री साडेदहा ते सकाळी ६ या वेळेत २४ विशेष बसगाड्या चालविल्या जाणार आहेत.

Swapnil S

मुंबई : मुंबईत गणेशोत्सवाच्या काळात भाविक तसेच पर्यटकांना वेगवेगळ्या ठिकाणी गणपती मंडळांना भेट देता यावी, या उद्देशाने बेस्टतर्फे रात्री साडेदहा ते सकाळी ६ या वेळेत २४ विशेष बसगाड्या चालविल्या जाणार आहेत.

७ सप्टेंबर ते १६ सप्टेंबर या कालावधीत या विशेष बसगाड्या चालविल्या जातील. दक्षिण मुंबईतून उत्तर-पश्चिम मुंबई परिसराकडे गिरगाव, लालबाग, परळ, चेंबूर आदी मार्गे या बस चालविल्या जातील. यात मार्ग क्रमांक ४ मर्यादित, ७ मर्यादित, ८ मर्यादित, ए-२१, ए-२५, ए-४२, ४४, ६६, ६९ आणि सी- ५१ यांचा समावेश आहे. प्रवाशांनी मागणी केल्यास आणखी काही मार्गांवर अशी सेवा दिली जाईल, असे बेस्ट प्रशासनाने म्हटले आहे.

२२ सप्टेंबरपासून नवे GST दर लागू; कोणत्या वस्तू स्वस्त, तर कोणत्या राहणार स्थिर? वाचा सविस्तर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! नवी झळाळी घेऊन येतेय 'मोनोरेल'; पाहा काय आहेत नवे बदल?

UPSC उमेदवार पडताळणीसाठी AI ची मदत घेणार

Mumbai-Ahmedabad Bullet Train Project : बुलेट ट्रेन प्रकल्पाला वेग; घणसोली-शीळफाटा दरम्यान पाच किमीचा बोगदा पूर्ण

Kalyan-Dombivli : रहिवाशांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई - शिंदे