प्रसूतीवेळी बाळ जमिनीवर पडून अपघात, विरारमध्ये धक्कादायक प्रकार; नवजात बालकावर ठाण्यातील NICU मध्ये उपचार प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

प्रसूतीवेळी बाळ जमिनीवर पडून अपघात, विरारमध्ये धक्कादायक प्रकार; नवजात बालकावर ठाण्यातील NICU मध्ये उपचार

विरार पश्चिमेतील डॉ. जोगळेकर रुग्णालयात प्रसूतीदरम्यान कथित वैद्यकीय हलगर्जीपणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सात महिन्यांच्या गर्भवती महिलेच्या प्रसूतीवेळी नवजात बालक अडीच ते तीन फूट उंचीवरून थेट जमिनीवर पडल्याचा गंभीर आरोप पीडित महिला आणि तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.

Swapnil S

वसई : विरार पश्चिमेतील डॉ. जोगळेकर रुग्णालयात प्रसूतीदरम्यान कथित वैद्यकीय हलगर्जीपणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सात महिन्यांच्या गर्भवती महिलेच्या प्रसूतीवेळी नवजात बालक अडीच ते तीन फूट उंचीवरून थेट जमिनीवर पडल्याचा गंभीर आरोप पीडित महिला आणि तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेत बालकाच्या डोक्याला दुखापत झाली असून त्याच्यावर ठाणे येथील एनआयसीयू (NICU) केंद्रात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला बुधवारी प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्यानंतर विरार पश्चिमेतील डॉ. जोगळेकर रुग्णालयात दाखल झाली होती. आदल्या रात्रीपासून तीव्र प्रसूती वेदना होत असल्याने तसेच सकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास बाळ बाहेर येत असल्याची जाणीव होत असल्याचे तिने वारंवार डॉक्टर आणि परिचारिकांना सांगितल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, तिच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, महिलेला प्रसूती कक्षात नेण्यासाठी स्ट्रेचर किंवा व्हीलचेअर उपलब्ध करून देण्यात आली नाही. उलट, तीव्र वेदनांमध्ये असतानाही तिला उभे राहण्यास सांगण्यात आले. त्याचवेळी प्रसूती होऊन नवजात बालक थेट जमिनीवर पडल्याचा आरोप करण्यात आला आहे.

आम्ही डॉक्टर आणि परिचारिकांना वारंवार महिलेला असह्य प्रसूती वेदना होत असल्याचे सांगत होतो. मात्र, वेळेवर कोणीही दखल घेतली नाही. स्ट्रेचर किंवा व्हीलचेअर दिली असती, तर हा प्रकार घडला नसता.
पीडित महिलेचे नातेवाईक

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणी प्राध्यापक निलंबित; 'त्या' निवेदनावरून संस्थेची माफी

Mumbai : ‘बटरफ्लाय’ रोखणार पाणी गळती; जलवाहिन्यांवर बटरफ्लाय झडपा बसवणार, गणेश खणकर यांच्या मागणीची दखल

Mumbai : चौपाटी, विसर्जनस्थळी चोख व्यवस्थापन; देशभरातील तज्ज्ञांकडून पालिका, पोलिसांचे कौतुक

गणेश विसर्जनासाठी BMC सज्ज; ३८३ कृत्रिम तलावांची व्यवस्था, ६७ नैसर्गिक विसर्जनस्थळांवरही सुविधा, २५ हजार अधिकारी-कर्मचारी तैनात

बार्सिलोनामध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’; महाराष्ट्र मंडळ स्पेनतर्फे गणेशोत्सव, स्पॅनिश कलाकारांचाही सहभाग