मुंबई

Ambernath: बैलगाडा शर्यतीच्या वादातून अंबरनाथमध्ये गोळीबार

अंबरनाथ (Ambernath) एमआयडीसीतील सुदामा हॉटेलजवळ गोळीबाराची घटना समोर अली असून पुलिलिसासनचा तपस सुरु

प्रतिनिधी

बैलगाडा शर्यतीच्या वादातून अंबरनाथमध्ये दिवसाढवळ्या दोन गटांमध्ये अंधाधुंद गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना एका नामांकित हॉटेल समोर घडली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी चौकशी सुरु केली असून कोणीही जखमी झाले नाही.

पनवेलमधील पंढरी फडके आणि कल्याणचे राहुल पाटील ही दोन नावे बैलगाडा शर्यतीत नेहमीच चर्चेत राहिले आहेत. गेल्या वर्षीचा मोसमात या दोन्ही गटातील बैलगाड्यांना प्रवेश नाकारण्यात आला होता. हे दोन्ही गट एकमेकांच्या विरोधात जाण्याची शक्यता असल्यामुळे ही दक्षता बाळगण्यात आली होती. मात्र आता बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू झाल्याने हे दोन गट पुन्हा एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, बैलगाडा शर्यती संदर्भात बोलवण्यात आलेल्या बैठकीत फडके आणि राहुल पाटील गटात मोठ्या प्रमाणात वाद सुरू झाले. त्यातूनच फडके गटाने पाटील गटावर अंदाधुंद गोळीबार केला. अंबरनाथच्या एमआयडीसीतील सुदामा हॉटेलजवळ गोळीबाराची ही घटना घडली. १५ ते २० गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

UPI शुल्कावर GST? पात्र व्यापाऱ्यांना इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा करता येणार

Mumbai : स्नॅपचॅटवर मैत्री, व्हिडिओ कॉलचं रेकॉर्डिंग अन् ब्लॅकमेलिंग; तरुणीकडून ४० हजार उकळले, आरोपी पंजाबमधून अटकेत

सोने हॉलमार्किंग शुल्कात वाढ; सणासुदीच्या हंगामापूर्वी ₹४५ वरून २७५ पर्यंत भार

कृषी उत्पन्न बाजार समित्या रोजगारनिर्मितीचे केंद्र बनवणार; पणन मंत्री जयकुमार रावल यांचे प्रतिपादन

Thane : शासकीय रुग्णवाहिकांची डिझेलसाठीची धावपळ थांबणार! 'ड्राईव्ह ट्रॅक प्लस' कार्डमुळे इंधनाची अडचण दूर होणार