मुंबई

धारावीतील अमीर शेख इकोफ्रेंडली मूर्ती तयार करण्यात व्यस्त

धारावीमध्ये देवता कला केंद्र या ठिकाणी अमीर शेख हा मूर्तिकार मागील अनेक वर्षांपासून गणरायाच्या सुबक मूर्ती तयार करत आहे

देवांग भागवत

गणेशोत्सव म्हटले की, सर्वधर्मीय मोठ्या उत्साहात, आतुरतेने लाडक्या बाप्पाची वाट पाहत असतात. गणपती बाप्पा सर्वांच्या हृदयी इतका ठासून भरला आहे की, यावेळी जातपात विसरून आपसूकच त्याचा जयघोष केला जातो. विविध धर्मीय लोक गणरायाची आपल्या घरी तर काही गणरायाची मूर्ती घडवतातदेखील. याचे उत्तम उदाहरण म्हणजे अमीर शेख.

मुंबईतील धारावीमध्ये देवता कला केंद्र या ठिकाणी अमीर शेख हा मूर्तिकार मागील अनेक वर्षांपासून गणरायाच्या सुबक मूर्ती तयार करत आहे. मागील पाच वर्षांपासून गणेशोत्सवासाठी गणेशमूर्ती बनवत आहे. अमीर पेपरमॅशपासून इकोफ्रेंडली मूर्ती तयार करतो. या मूर्ती पर्यावरणाच्या दृष्टीने पर्यावरणपूरक असून पाण्यात विरघळण्यासही सोप्या आहेत. वजनाने हलक्या असल्याने सहजरीत्या पाण्यात विरघळतात. सध्या अमीर सात दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवासाठी अंतिम रंगकाम तसेच डायमंड काम करण्यात व्यस्त आहेत.

"व्हिडीओ पाहायला आमच्याकडे वेळ नाही"; CJP आंदोलकांच्या याचिकेवर सरन्यायाधीश सूर्य कांत यांचे भाष्य, तातडीच्या सुनावणीस नकार

आता AI ठेवणार पक्ष्यांवर नजर! महाराष्ट्रात उभारलं जाणार देशातील पहिलं AI-आधारित पक्षी अभयारण्य

Mumbai Rains : पावसात अडकलेल्या मुंबईकरांना 'Vi'चा दिलासा! स्टोअरमध्ये घेता येणार आश्रय, मोबाईल चार्जिंगचीही सोय

१८ वर्षीय तरुणाने घातला ६५ कोटींचा गंडा! AI च्या मदतीने बनवले १२१ बनावट अ‍ॅप्स

Mumbai Rain Alert : मुंबईत मुसळधार पावसासह भरतीचाही धोका; वादळी वाऱ्याचा इशारा, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन