मुंबई

अमित शहा, शरद पवार यांनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन; शहा सपत्नीक, तर पवारांची जावई, नातीसह उपस्थिती

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सोमवारी दुपारी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जाणार त्याआधीच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सकाळीच लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.

Swapnil S

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सोमवारी दुपारी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जाणार त्याआधीच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सकाळीच लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. बळीराजा व जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्याचे बळ दे अशी प्रार्थना बाप्पाच्या चरणी शरद पवार यांनी केली. विशेष म्हणजे मुख्यमंत्री पदावर असताना शरद पवार लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी आले होते. त्यानंतर ते आता लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी आले. यावेळी शरद पवारांचे जावई सदानंद सुळे आणि नात रेवती सुळे बरोबर होते.

नवसाला पावणारा गणपती अशी भावना मनाशी बाळगत लालबागच्या राजाचे भक्त दरवर्षी बाप्पाच्या दर्शनासाठी येत असतात. सॅलिब्रिटी, नेतेमंडळी, उद्योगपती लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येतात. सोमवारी सकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येण्याआधी शरद पवार यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सपत्नीक सोमवारी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी लालबाग राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने श्रीगणेश प्रतिमा, पुष्पगुच्छ, श्रीफळ व शाल भेट देत शहा यांचे स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकासमंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार आशिष शेलार, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, माजी मंत्री विनोद तावडे हे उपस्थित होते.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी