मुंबई

विविध रंगसंगतीचे कलात्मक प्रदर्शन

devang bhagwat

चित्रकार नीना सिंग यांच्या ऍक्रिलिक रंगांच्या लेपनातून कॅनवास व पेपरवर निर्मिलेल्या नवनिर्मित चित्रांचे एकल प्रदर्शन मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीत आयोजित करण्यात आले आहे. १५ ते २१ नोव्हेंबर ह्या दरम्यान हे प्रदर्शन रसिकांना रोज सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत विनामूल्य बघता येणार आहे.

नीना सिंग यांनी प्रस्तुत चित्रमालिकेत आपल्या कलात्मक व वैशिष्ट्यपूर्ण तसेच सौंदर्ययुक्त शैलीचा वापर करून तयार केलेली चित्रे निसर्गाची अमूर्त भावपूर्ण रूपे, त्यातील प्रासंगिक बदल, विविध ऋतूत साकारणारी त्याची रूपे, त्यातील दैवी शक्ती व निरामयता प्रस्तुत प्रदर्शनात आपल्या चित्राद्वारे व्यक्त केली आहे. ही चित्रे त्यांनी कोरोनाकाळात साकारली असून सर्व प्रकारची अस्थिरता व बंधनयुक्त परिस्थिति आसपास असली तरी आपल्या अमूर्त चित्रसंपदेतून तिने प्रत्येकाला मानवी आयुष्य प्रकाशरूपी ऊर्जेच्या रूपकाचा आधार घेऊन मुक्त मनाने जगण्याचा व त्याद्वारे सुखी जीवनाचा एक प्रभावी संदेश दिला आहे. निळा, हिरवा, लाल, पिवळा, नारिंगी, पांढरा व अन्य रंगसंगतीच्या कलात्मक समन्वयातून तिने आपल्या खासगी आयुष्याशी निगडित अशा अनेक अनुभवांचा प्रतिकात्मक आधार घेऊन या चित्रांची निर्मिती केली आहे.

पुण्यासह सांगली,मिरज,कोल्हापूर आणि सोलापूर रेल्वे स्थानके बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला पोलीसांनी ठोकल्या बेड्या

सूनेनं केली सासऱ्याच्या घरात चोरी, मामेभावासोबत केलं परफेक्ट प्लॅनिंग, तीन लाखांची रोकड चोरली

"नव्या भारतासाठी ‘हिंदवी स्वराज्या`ची गरज!" योगी आदित्यनाथ यांची तोफ नालासोपाऱ्यातून धडाडली!

पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला; अखेरच्या क्षणी मतदार भेटीसाठी सर्वपक्षीय लगबग

कार देणार बाईकएवढं मायलेज! 'ही' CNG कार लवकरच होतीये लॉन्च, किती असेल किंमत?