मुंबई

वयोवृद्ध निर्मात्याची प्रॉपटी हडपण्याचा प्रयत्न

फसवणूक करून प्राप्त केलेल्या प्रॉपटीची कागदपत्रे पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत

नवशक्ती Web Desk

मुंबई : व्यवसायाने निर्माता असलेल्या वयोवृद्ध पतीच्या आजारपणाचा गैरफायदा घेऊन त्याची प्रॉपटी हडपण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गेल्या अडीच वर्षांपासून फरार असलेल्या आरोपी पत्नीला अखेर ओशिवरा पोलिसांनी अटक केली. रेणू बिजेंद्रपाल सिंग असे या ५६ वर्षीय आरोपी पत्नीचे नाव असून तिने निर्मात्या पतीची विविध दस्तावेजावर स्वाक्षरी घेऊन स्वत:च्या नावावर पॉवर ऑफ ॲॅटनी करीन पतीनेच तिला गिफ्ट डिड केल्याचे चित्र निर्माण करण्यात आले. अशाप्रकारे तिने ३ कोटी ६१ लाखांची प्रॉपटी स्वत:च्या नावावर केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर तिला अंधेरीतील न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. तिच्याकडून फसवणूक करून प्राप्त केलेल्या प्रॉपटीची कागदपत्रे पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.

SIR विरोधात ठाकरे बंधूंचा एल्गार; CJP च्या आंदोलनाला पाठिंबा, ४ ऑक्टोबरला मुंबईत संयुक्त मोर्चा

...तर ठाण्यातील क्लस्टरवर विश्वास कसा ठेवायचा? केदार दिघेंचा महापालिकेला सवाल

Kolhapur : भरधाव Ertiga ची दुचाकीला जबर धडक; पती-पत्नी थेट हवेत; एकजण जागीच ठार, अंगावर काटा आणणारा Video व्हायरल

Mumbai : १४ फूट उंच झोपड्यांच्या कारवाईवरून विरोधक आक्रमक; काँग्रेस, ठाकरेंच्या शिष्टमंडळांनी घेतली आयुक्तांची भेट

फिल्मसिटीतील मैदानाला GMLR चा फटका; १७४ कोटी नुकसानभरपाई देण्याची महामंडळाची मागणी, BMC कडून २० कोटी देण्याचा प्रस्ताव