राहुल नार्वेकर (संग्रहित छायाचित्र) 
मुंबई

राहुल नार्वेकरांविरोधातील तक्रारीची चौकशी होणार

मुंबई महापालिका निवडणुकीदरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उमेदवारांना धमकावून अर्ज भरण्यापासून रोखल्याच्या तक्रारीची राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी दखल घेतली.

Swapnil S

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीदरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उमेदवारांना धमकावून अर्ज भरण्यापासून रोखल्याच्या तक्रारीची राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी दखल घेतली. मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत.

कुलाबा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक २२५, २२६ आणि २२७ या तीन प्रभागांत नार्वेकर यांचे नातेवाईक बंधू मकरंद नार्वेकर, बहीण गौरवी शिवलकर आणि वहिनी हर्षदा नार्वेकर यांनी अर्ज दाखल केले. अर्ज दाखल करताना राहुल नार्वेकर स्वतः उपस्थित होते. यावेळी इतर पक्षांच्या उमेदवारांना धमकावून अर्ज भरण्यापासून रोखल्याचा तसेच अधिकाऱ्यांवर दबाव आणल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर काही उमेदवारांनी राज्य निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार दाखल केली. संसदीय तसेच विधिमंडळातील संवैधानिक पदावरील व्यक्तींनी निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करू नये, अशी प्रथा असतानाही नार्वेकरांनी त्याचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे.

व्हिडीओ तपासणार

राज्य निवडणूक आयोगाने या तक्रारीची तत्काळ दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. अर्ज दाखल करण्यावेळी उपस्थित असलेल्यांचा व्हिडीओ, अधिकाऱ्यांचा जबाब आणि संबंधित सर्व माहिती तपासून आयुक्तांकडून अहवाल मागविण्यात आला आहे.

“प्रिय उमर, आम्ही सगळे..."; न्यूयॉर्कचे महापौर झोहरान ममदानी यांचे तुरूंगात असलेल्या उमर खालिदसाठी पत्र

"सन्माननीय अध्यक्ष..." म्हणत संजय राऊतांनी राहुल नार्वेकरांचा 'तो' व्हिडिओ केला शेअर

"मशीन तर तू बांगलादेशी असल्याचं सांगतेय..."; UP पोलिसांच्या 'अविष्कार'चा Video व्हायरल

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जर्मनीत भारतीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू; जीव वाचवण्यासाठी अपार्टमेंटमधून मारली होती उडी

Mumbai : तिकीट मागितलं, थेट CBI चं ओळखपत्र दाखवलं; लोकलच्या फर्स्ट क्लासमधून प्रवास करणाऱ्या तोतयाचं बिंग फुटलं