प्रसिद्ध उद्योजक दाम्पत्य अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांनी यंदाची दिवाळी वेगळ्या पद्धतीने साजरी केली. भव्य समारंभ किंवा खासगी पार्टीऐवजी त्यांनी अनाथआश्रमातील मुलांसोबत दिवाळी सेलिब्रेशन केले आहे. त्यांची या कृतीने सर्वांचेच लक्ष वेधले.
त्यांच्या या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चर्चेत आहे. कोणत्याही प्रकारचा दिखावा न करता राधिका आणि अनंत अंबानी अगदी साध्या पोषाखात अनाथआश्रमात पोहचले. तेथे त्यांनी मुलांसोबत संवाद साधला. त्यांच्यासोबत खेळ खेळले आणि चॉकलेट, खाऊचेही वाटप केले. यामुळे आश्रमातील मुलांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू उमटले.
या भेटीचे काही व्हिडिओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावर समोर आल्यानंतर काही क्षणांतच व्हायरल झाले. ज्यामध्ये राधिका मुलांना चॉकलेट देताना आणि अनंत त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारताना दिसत आहेत. दोघांचा साधा आणि आत्मीय स्वभाव पाहून नेटिझन्सनी त्यांचं कौतुक केलं.
एका युजरने लिहिलं, देव तुम्हाला अधिक सामर्थ्य देवो, कारण तुम्ही सणाचा खरा अर्थ जगाला दाखवला आहे. तर, दुसऱ्याने म्हटलं, हे पाहून मन भारावून गेलं. प्रसिद्धीपेक्षा प्रेमाला प्राधान्य देणं हीच खरी दिवाळी.