अंधेरीत ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त; महिन्याला २५ ते ३० कोटींच्या एमडी ड्रग्जची विक्री  
मुंबई

Mumbai : अंधेरीत ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त; महिन्याला २५ ते ३० कोटींच्या एमडी ड्रग्जची विक्री

गुजरात पोलिसांच्या ताब्यातून फरार झाल्यानंतर अंधेरी येथील चाळीत भाड्याने घर घेऊन 'एमडी ड्रग्ज'चा कारखाना थाटून दरमहा तब्बल २५ ते ३० कोटी रुपयांच्या ड्रग्जची विक्री करणारा कुख्यात ड्रग्ज तस्कर मोहम्मद आरीफ मोहम्मद इलियास शेख याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

Swapnil S

मुंबई : गुजरात पोलिसांच्या ताब्यातून फरार झाल्यानंतर अंधेरी येथील चाळीत भाड्याने घर घेऊन 'एमडी ड्रग्ज'चा कारखाना थाटून दरमहा तब्बल २५ ते ३० कोटी रुपयांच्या ड्रग्जची विक्री करणारा कुख्यात ड्रग्ज तस्कर मोहम्मद आरीफ मोहम्मद इलियास शेख याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी मोहम्मद आरीफ याने अंधेरीत दरमहा १३ हजार रुपये भाड्याने एक खोली घेऊन एमडी ड्रग्ज तयार करण्याचा कारखाना थाटला. ही बाब कुणाच्या लक्षात येऊ नये यासाठी तो त्या ‘एमडी ड्रग्ज’ची विक्री स्थानिक भागात न करता ते देशाच्या विविध भागात पाठवत होता. सांताक्रूझ येथील गोळीबार नगर येथील चाळीत राहणारा शेख अंधेरीतील जागेत केवळ कारखानाच चालवत होता.

अमली पदार्थांच्या व्यापाराचा हिशेब पत्नीकडे मोहम्मद लियाकतची पत्नी नसरीन ही या अमली पदार्थांच्या व्यापारातून मिळणाऱ्या प्रचंड कमाईचा हिशेब ठेवत असे. तिच्या बँक खात्यात लाखो रुपये जमा असल्याचे तपासात आढळल्याने पोलिसांनी तिचे बँक खातेही गोठवले आहे. याबाबत आणखी काही बँक खाती आहेत का याचा तपास पोलीस करीत आहेत.

आरोपी मोहम्मद आरीफ शेख याच्यावर आतापर्यंत पंधरा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. गुजरातमधील सराईत ड्रग तस्कर असलेल्या मोहम्मद आरीफ शेखला तेथील न्यायालयाने दहा वर्षांची शिक्षा सुनावली होती. मात्र तीन वर्षांपूर्वी पॅरोलवर बाहेत येताच तो फरार झाला होता. त्यानंतर त्याने मुंबईत ड्रग कारखाना थाटण्याचा निर्णय घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्या अन्य साथीदारांचा पोलिस कसून शोध घेत आहेत. भाड्याने जागा घेऊन ड्रग कारखाना चालवण्याची मुंबईतील काही पहिलीच घटना नाही. या आधीही मुंबई पोलिसांनी असे अनेक कारखाने उद्ध्वस्त केले आहेत.

साथीदाराला उत्तर प्रदेशातून अटक

अलिकडेच खार पोलिस गस्त घालत असताना त्यांनी आरोपीला संशयास्पद स्थितीत फिरताना पाहिले. त्याची झडती घेण्यात आली असता त्याच्याकडे १५ ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग आणि मोबाईल फोन सापडला. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या अंधेरी येथील सहार रोडवरील भास्कर चाळीतील खोलीवर छापा घातला असता तेथे एमडी ड्रग तयार करण्याचा कारखाना पाहून पोलिस अवाक् झाले. त्या ठिकाणची यंत्रसामग्री पोलिसांनी जप्त केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी मोहम्मद इलियासचा साथीदार रिजवान अहमद लियाकत याला उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथून अटक केली आहे. तो शेखने पाठवलेले ‘एमडी’ त्या परिसरात विकत असे.

नवी मुंबईला 'धुक्याऐवजी' प्रदूषणाचा विळखा; पहाटे व्यायामाला आलेले नागरिक प्रदूषित हवेत, 'हेल्दी सिटी'च्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह

Mumbai Rain : मुंबईसह वसई-विरारमध्ये मुसळधार पाऊस; अनेक भागांत पाणी साचलं, ऑरेंज अलर्ट जारी, VIDEO

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आझाद मैदानातील आंदोलनाला मुंबई पोलिसांचा नकार; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

Rajapur : गणपतीसाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांच्या गाडीला भीषण अपघात; ८-१० जण गंभीर जखमी, वाहनाचा चक्काचूर

Hartalika Teej 2026 : यंदा हरतालिका अन् गणेश चतुर्थी एकाच दिवशी; उपवास कधी सोडायचा? जाणून घ्या संपूर्ण माहिती