संग्रहित छायाचित्र  
मुंबई

Mumbai : सेव्हन हिल्स हॉस्पिटल BMC च्या ताब्यात द्या! अंधेरी विकास समितीचा उद्या आंदोलनाचा इशारा

अंधेरी येथील अद्ययावत सेव्हन हिल्स हॉस्पिटल उद्योगपती मुकेश अंबानी यांना देण्याचा घाट घातला जात आहे. परंतु या हॉस्पिटलचे खासगीकरण करू नये, ते मुंबई महापालिकेच्या ताब्यात द्यावे, या मागणीसाठी ६ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता हॉस्पिटलसमोर आंदोलन करण्याचा इशारा अंधेरी विकास समितीने दिला आहे.

Swapnil S

मुंबई : अंधेरी येथील अद्ययावत सेव्हन हिल्स हॉस्पिटल उद्योगपती मुकेश अंबानी यांना देण्याचा घाट घातला जात आहे. परंतु या हॉस्पिटलचे खासगीकरण करू नये, ते मुंबई महापालिकेच्या ताब्यात द्यावे, या मागणीसाठी ६ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता हॉस्पिटलसमोर आंदोलन करण्याचा इशारा अंधेरी विकास समितीने दिला आहे.

मुंबईचे माजी उपमहापौर तथा काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेश शर्मा म्हणाले की, अंधेरी येथील सेव्हन हिल्स हॉस्पिटल मुंबई महानगरपालिकेने ताब्यात घ्यावे, यासाठी मागील काही महिन्यांपासून प्रयत्न केला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालिका व संबंधित यंत्रणांकडे यासंदर्भात पाठपुरावा केला. परंतु मुख्यमंत्री वा अन्य यंत्रणांकडून प्रतिसाद नाही.

मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारने सार्वजनिक गरजा लक्षात घेऊन सेव्हन हिल्स हॉस्पिटलच्या जागेत प्रगत वैद्यकीय संशोधन केंद्र आणि शिक्षणासह आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉस्पिटल म्हणून विकसित करण्याचा विचार करणे आवश्यक आहे. सेव्हन हिल्स हॉस्पिटलच्या आवारात शिल्लक असलेल्या जागेवर मेडीकल व नर्सिंग कॉलेज सुरू करता येऊ शकते, असेही शर्मा म्हणाले.

शर्मा यांनी सांगितले की, सेव्हन हिल्स हॉस्पिटलच्या जागेचा मूळ मालकी हक्क मुंबई महानगरपालिकेचा आहे. महानगरपालिकेने ही जागा सेव्हन हिल्स हॉस्पिटलला लीजवर दिली आहे. मुंबई महापालिकेने स्वतः ताब्यात घेतली तर मुंबईमध्ये आरोग्य केंद्र बनू शकते.

हाॅस्पिटलची किंमत ४ हजार कोटी?

अंधेरीतील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या हॉस्पिटलची बाजारभावानुसार ३ हजार ते ४ हजार कोटी रुपये किंमत आहे. मुंबईची वाढती लोकसंख्या लक्षात घेता त्यांच्या आरोग्य सेवांसाठी हे हॉस्पिटल एक मोठी संधी आहे, त्यासाठी सध्या असलेल्या सर्व सुविधांचा विचार करता मुंबई महानगरपालिकेने वेळ न घालवता हे हॉस्पिटल ताब्यात घेऊन मुंबईकरांना अत्याधुनिक आरोग्य सेवा देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही राजेश शर्मा म्हणाले.

UPI व्यवहारांवरील MDR शुल्काला तूर्तास ब्रेक! सणासुदीत NPCI चा मोठा निर्णय, आता कधीपासून मोजावे लागणार पैसे?

Nalasopara : लग्नाचं आमिष दाखवून तरुणीवर वारंवार अत्याचार; आणखी ७० ते ८० महिलांच्या शोषणाचाही आरोप

Punjab : फेसबुक लाइव्ह सुरू असतानाच गोळीबार; ड्रग्सविरोधी कार्यकर्ते परविंदर झोटा यांची हत्या, Video

मुंबईकरांनो, पाण्याचा गैरवापर केला तर कारवाई! २०२७ पर्यंतच्या पाणी नियोजनाचे आव्हान, १० टक्के पाणीकपात कायम

Cyber Scam : व्हॉट्सॲपवर आलेल्या 'त्या' मेसेजला 'NO' रिप्लाय करताय? बँक खातं होऊ शकतं रिकामं; पोलिसांचा इशारा