Mumbai : एंजेल वनच्या संस्थापकांनी जुहूत खरेदी केला ७११ कोटी रुपयांचा टॉवर; भारतातील सर्वात मोठा निवासी व्यवहार 
मुंबई

Mumbai : एंजेल वनच्या संस्थापकांनी जुहूत खरेदी केला ७११ कोटी रुपयांचा टॉवर; भारतातील सर्वात मोठा निवासी व्यवहार

'एंबसी डेव्हलपमेंट्स लिमिटेड'ने 'एंजेल वन लिमिटेड'चे संस्थापक, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दिनेश ठक्कर यांच्यासोबत जुहू येथील 'एंबसी टेराझा' प्रकल्पातील संपूर्ण निवासी टॉवरच्या विक्रीसाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. हा व्यवहार सुमारे ७११ कोटी रुपयांना झाला आहे.

प्रतिनिधी

स्वीटी भागवत/मुंबई

जुहू परिसरातील मालमत्तेचा सध्याचा बाजारभाव प्रकल्प आणि समुद्रकिनाऱ्याच्या दृश्यानुसार प्रति चौरस फूट ७०,००० ते १.३ लाख रुपयांच्या दरम्यान आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हा व्यवहार भारतातील एकाच निवासी युनिटचा आतापर्यंतचा सर्वात मोठा सौदा ठरला आहे. ही इमारत तळमजला अधिक सात मजले अशा स्वरूपाची असून तिचे 'रेरा' कार्पेट क्षेत्रफळ ६३,००० चौरस फूट आहे.

जुहू तारा रोड येथे स्थित 'एंबसी टेराझा' हा प्रकल्प दोन एकरांपेक्षा जास्त जागेवर पसरलेला असून त्यात सुमारे ५० आलिशान निवासस्थाने आहेत. या प्रकल्पाचे एकूण विकास मूल्य ३,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचा अंदाज असून, हा प्रकल्प डेव्हलपमेंट मॅनेजमेंट मॉडेलअंतर्गत विकसित केला जात आहे. या प्रकल्पात पाच टॉवरमध्ये प्रत्येक मजल्यावर एकच निवासस्थान असून, येथून समुद्र आणि शहराचे विहंगम दृश्य दिसते. तसेच येथे लँडस्केप गार्डन्स आणि अत्याधुनिक लाईफस्टाईल सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, प्रॉपर्टी कन्सल्टंट 'इंडिया सोथेबीज इंटरनॅशनल रियल्टी' आणि डेटा ॲनालिटिक्स फर्म 'सीआरई मॅट्रिक्स'च्या अहवालानुसार, मुंबईत १० कोटी रुपये आणि त्याहून अधिक किमतीच्या आलिशान घरांची विक्री यंदाच्या पहिल्या सहामाहीत १२ टक्क्यांनी वाढून विक्रमी १८,५१२ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. विक्री झालेल्या अशा आलिशान युनिट्सची संख्या ७६१ वरून ९५७ वर पोहोचली आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

'वंदे मातरम्' न म्हणणाऱ्यांना शिक्षा नको; धार्मिक कारणास्तव 'वंदे मातरम्' नाकारणाऱ्यांना न्यायालयाचे घटनात्मक संरक्षण

मुख्यमंत्री आजपासून बांधावर! दुष्काळ पाहणीसाठी राज्याच्या दौऱ्यावर; उपाययोजनांसाठी मंत्रिमंडळ उपसमितीची घोषणा

परतीचा पाऊसही ठरणार अपुरा; दुष्काळाचे संकट अटळ, खरिपाच्या पिकांनाही फारसा दिलासा नाही

Mumbai : रस्त्यांवर फटाके फोडण्यास बंदी; धार्मिक उत्सवांच्या नावाखाली नियमभंग खपवून घेणार नाही - हायकोर्ट

मतदार यादीतील दुरुस्तीसाठी ३० सप्टेंबरपर्यंत संधी