मुंबई

कस्तुरबा रुग्णालयात मुख्य लिपिक अनुपस्थितीत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संताप

प्रतिनिधी

कस्तुरबा रुग्णालय प्रशासनाच्या अकार्यक्षम कार्यपद्धतीमुळे कामगारांची अत्यावश्यक कामे विहित कालावधीत पूर्ण होत नाहीत. त्यामुळे या अडचणी सोडविण्यासाठी त्यांना अधिकाऱ्यांकडे खेट्या माराव्या लागत आहेत. अन्यथा लिपिक येईपर्यंत ही कामे मार्गी लावण्यासाठी वाट पाहावी लागत आहे. त्यामुळे आठवड्यात होणाऱ्या कामांसाठी दीड-दीड महिना उशीर होत असल्याने तातडीने लिपिकांचा प्रश्न मार्गी लावा, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून होऊ लागली आहे.

रुग्णालयात महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात असलेले मुख्य लिपिक घाडगे हे आजारपणामुळे अनुपस्थित आहेत. तसेच लिपिक पवन अहिरराव व नम्रता या देखील अनेकदा अनुपस्थित असतात. त्यावेळी त्यांच्या जागी अतिरिक्त लिपिक ठेवणे आवश्यक असताना रूग्णालय प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे कामगाराच्या पदोन्नतीची कामे, वैद्यकीय खर्चाची परिपूर्ती, दाव्याची प्रकरणे, रजा, आदी कामे करण्यासाठी अधिकाऱ्यांकडे खेट्या घालाव्या लागतात. त्यांच्याकडेही अन्य कामे असल्याने कर्मचाऱ्यांची कामे प्रलंबित राहतात. असे एका अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले.

रुग्णालय प्रशासनाविरोधात तीव्र असंतोष

कर्मचाऱ्याच्या या अडचणी सोडविण्याकडे अधीक्षक डॉ. चंद्रकांत पवार यांचे दुर्लक्ष होत आहे. त्यांच्याकडून लिपीकासंदर्भात निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे. येत्या १५ दिवसात निर्णय न झाल्यास आंदोलनाबाबत निर्णय घ्यावा लागेल, असे म्युन्सिपल मजदूर युनियनचे चिटणीस प्रदीप नारकर यांनी सांगितले.

"काँग्रेसमुळं देशाची पाच दशके वाया गेली..."शिवाजी पार्क सभेतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

"पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर...", राज ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींची पंडित नेहरूंशी तुलना

पंतप्रधान नरेंद्र मोदी सभास्थळी पोहोचले, शिवाजी पार्कात काय बोलणार मोदी?

मुंबईत केजरीवाल Vs मोदी आमनेसामने ; शिवाजी पार्कात महायुती तर BKC मध्ये महाविकास आघाडीची सभा

मंत्री छगन भुजबळ महायुतीवर नाराज? गिरीश महाजन भेटीला, राजकीय चर्चेला उधाण