मुंबई

शिवसेनेला आणखी एक धक्का, दोन शाखाप्रमुखांनी दिला राजीनामा

प्रतिनिधी

शिवसेना पक्षप्रमूख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आता मुंबईतही धक्के बसू लागले आहेत. शाखा क्रमांक ३ चे शाखाप्रमुख प्रकाश पुजारी आणि शाखा क्रमांक १२चे शाखाप्रमुख कौस्तुभ महामुणकर यांनी राजीनामा देऊन शिवसेनेला आणखीन धक्का दिला आहे. तर दुसरीकडे पक्षातील पडझड रोखण्यासाठी शिवसेनेकडूनही जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

“गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडी आणि आमदार प्रकाश सुर्वे यांच्याशी असलेले माझे घनिष्ठ संबंध पाहता प्रभागातील पदाधिकारी व शिवसैनिक माझ्याकडे नाहक संशयाने पाहत परस्परात संभ्रमाचे वातावरण तयार करून माझ्या बाबतीत चुकीचे संदेश पोहोचवत आहेत. याकारणाने मी माझ्या शाखाप्रमुख पदाचा राजीनामा आपणाकडे सुपुर्द करत आहे,” असे प्रकाश पुजारी यांनी शिवसेना विभागप्रमुख विलास पोतनीस यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

आमदारांची बंडखोरी होऊनही आतापर्यंत एकाही शाखाप्रमुखाने उघडपणे राजीनामा दिला नव्हता. आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शाखाप्रमुखांचे राजीनामे म्हणजे शिवसेनेसाठी मोठे धक्के असल्याचे मानले जात आहे. त्यातच शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या शिवसेना भवनात उद्धव ठाकरे स्वत: सातत्याने बसून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत असून संघटनेत फूट पडू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असताना शाखाप्रमुखांनी राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे. महिला शाखा संघटक सुषमा गायकवाड यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

"काँग्रेसमुळं देशाची पाच दशके वाया गेली..."शिवाजी पार्क सभेतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

"पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर...", राज ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींची पंडित नेहरूंशी तुलना

पंतप्रधान नरेंद्र मोदी सभास्थळी पोहोचले, शिवाजी पार्कात काय बोलणार मोदी?

मुंबईत केजरीवाल Vs मोदी आमनेसामने ; शिवाजी पार्कात महायुती तर BKC मध्ये महाविकास आघाडीची सभा

मंत्री छगन भुजबळ महायुतीवर नाराज? गिरीश महाजन भेटीला, राजकीय चर्चेला उधाण