मुंबई

ॲण्टॉप हिल येथील गोळीबारात तरुण जखमी; आर्थिक वाद कारणीभूत; मारेकऱ्याचा शोध सुरू

गोळीबारानंतर आरोपी तेथून पळून गेला. जखमी झालेल्या आकाशला स्थानिक रहिवाशांनी तातडीने शीव हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्याच्यावर तिथे उपचार सुरू आहेत. याप्रकरणी ॲण्टॉप हिल पोलिसांनी आरोपीविरुद्ध हत्येच्या प्रयत्नासह आर्म्स ॲक्ट कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Swapnil S

मुंबई : ॲण्टॉप हिल येथे आकाश गणेश कदम या तरुणावर त्याच्या मित्राने गोळीबार केला. या गोळीबारात आकाश हा गंभीररीत्या जखमी झाला असून, त्याच्यावर शीव हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. याप्रकरणी ॲण्टॉप हिल पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या आरोपी मित्राचा शोध घेत आहेत. आर्थिक वादातून हा प्रकार घडल्याचे बोलले जाते. वासंती गणेश कदम ही महिला ॲण्टॉप हिल येथील नाईकनगर, कृष्णा हॉटेलजवळील नवतरुण परिसरात राहते. आकाश हा तिचा मुलगा आहे. आरोपी आकाशचा मित्र असून, त्यांच्यात काही दिवसांपासून आर्थिक वाद सुरू होता. शनिवारी सकाळी सहा वाजता आकाश हा त्याच्या घरी झोपला होता. यावेळी आरोपी तिथे आला आणि त्याने आकाशच्या दिशेने गोळीबार केला. त्यात त्याच्या पोटात गोळी लागली होती.

गोळीबारानंतर आरोपी तेथून पळून गेला. जखमी झालेल्या आकाशला स्थानिक रहिवाशांनी तातडीने शीव हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्याच्यावर तिथे उपचार सुरू आहेत. याप्रकरणी ॲण्टॉप हिल पोलिसांनी आरोपीविरुद्ध हत्येच्या प्रयत्नासह आर्म्स ॲक्ट कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली असून, या पथकाने आरोपीच्या अटकेसाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. सकाळी झालेल्या या गोळीबाराच्या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

मद्य परवान्यावरून सरकारचा सावध पवित्रा; विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय परवाने वाटप नाहीच -अजित पवार

अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज पृथ्वीकडे परतणार

जनसुरक्षा कायदा ‘अर्बन नक्सल’विरोधात उपयुक्त ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘फिल्डिंग’; काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच, 'ही' नावे चर्चेत