मुंबई

मुंबई हायकोर्टात सात न्यायमूर्तींची कायम न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती

सर्वोच्च न्यायालयाच्या ‘कॉलिजियम’ने मुंबई उच्च न्यायालयात कार्यरत असलेल्या सात अतिरिक्त न्यायमूर्तींची कायम न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस केली आहे. याशिवाय दोन अतिरिक्त न्यायमूर्तींचा कार्यकाळ वाढविण्याची शिफारसही करण्यात आली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या ‘कॉलिजियम’ने मुंबई उच्च न्यायालयात कार्यरत असलेल्या सात अतिरिक्त न्यायमूर्तींची कायम न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस केली आहे. याशिवाय दोन अतिरिक्त न्यायमूर्तींचा कार्यकाळ वाढविण्याची शिफारसही करण्यात आली आहे.

मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायमूर्ती पदावर कार्यरत असलेल्या संतोष चपळगावकर, मिलिंद साठ्ये, नीला गोखले, यानशिवराज खोब्रागडे, महेंद्र चंदवानी, अभय वाघोसे आणि रवींद्र जोशी यांची कायम न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती बी. आर. गवई यांच्या ‘कॉलिजियम’ने केली आहे.

याशिवाय उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून कार्यरत असलेल्या संजय देशमुख व वृषाली जोशी यांचा कार्यकाळ एक वर्षाने वाढवण्याची शिफारस ‘कॉलिजियम’ने केली आहे. ‘कॉलिजियम’ने दिल्ली उच्च न्यायालयात कायम न्यायमूर्ती म्हणून गिरीश काटपलिया, मनोज जैन आणि धर्मेश शर्मा यांची नियुक्ती करण्याची शिफारससुध्दा केली आहे.

हरिनामाच्या गजराने विठ्ठलाची पंढरी दुमदुमली! पंढरीत १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी; आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा !

महागड्या शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध; सुप्रिया सुळे यांचे ठाम प्रतिपादन

आवाज मराठीचाच! उद्धव-राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर; राज्यभरातील मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण

डोममध्ये रंगला झिम्मा; शर्मिला ठाकरे, सुषमा अंधारे यांची फुगडी

देशात गरीबांची संख्या वाढणे ही चिंता वाढवणारी बाब; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन