मुंबई

मालमत्ता चोरी करणाऱ्यांची धरपकड

Swapnil S

मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वे हद्दीतील मालमत्ता चोरी करणाऱ्यांविरोधात मध्य रेल्वेच्या आरपीएफ टीमने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत रेल्वेची मालमत्ता चोरी करणाऱ्यांविरोधात कायद्याअंतर्गत ५६० जणांवर गुन्हा दाखल केला असून, १,२६२ जणांना अटक करण्यात आल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.

प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासह त्यांच्या सुरक्षेचीही जबाबदारी मध्य रेल्वे प्रशासनाची आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मध्य रेल्वेवरील उपनगरीय ट्रेनच्या ४२१ महिला डब्यांत आणि मेल - एक्स्प्रेस ट्रेनच्या १७६२ डब्यांत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे २४ तास पाळत ठेवली जाते. उपनगरीय गाड्यांच्या ५१२ महिला डब्यांमध्ये इमर्जन्सी टॉकबॅक सिस्टीम देण्यात आली आहे.

मध्य रेल्वेवरून विशेषतः रात्री जाणाऱ्या १०९ मेल/एक्स्प्रेस गाड्या आरपीएफ द्वारे एस्कॉर्ट केल्या जात आहेत, २०२३ मध्ये आमच्या सतर्क आरपीएफ जवानांनी ७१ प्रवाशांचे प्राण वाचवले, ११६५ अल्पवयीन मुलांची सुटका केली, ४७५ दलालांना अटक केली आणि ३९९ प्रकरणे नोंदवून १२५८६ तिकिटे जप्त केल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त