मुंबई

ढोलताशाच्या गजरात काळाचौकीच्या महागणपतीचे आगमन; शेकडोंच्या संख्येने भाविकांची हजेरी

काळाचौकी विभाग सार्वजनिक उत्सव मंडळाच्या महागणपतीच्या आगमन मिरवणूक सोहळ्याला वेगळीच शोभा आणली होती

प्रतिनिधी

गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात अगदी शिस्तबद्ध पद्धतीने काळाचौकीच्या महागणपतीचा आगमन सोहळा रविवारी गणसंकुलातून सुरू होऊन लालबाग आणि काळाचौकीपर्यंत पोहोचला. स्वातंत्र्याच्या अमृत मोहोत्सवामुळे यंदा सुरुवातीला एका चिमुकलीच्या रूपात भारतमाता साकारण्यात आली होती. मोर, कोंबडा आणि वाघ, सिंह नृत्याने जणू काळाचौकी विभाग सार्वजनिक उत्सव मंडळाच्या महागणपतीच्या आगमन मिरवणूक सोहळ्याला वेगळीच शोभा आणली होती.६७ व्या वर्षात पदार्पण केलेल्या या मंडळाने दरवर्षी नवनवे उपक्रम घेउन आपले वेगळेपण जपले आहे. लालबाग उड्डाणपूल, उड्डाणपुलाखालील जागा, शेजारी असलेल्या घरांच्या मोकळ्या जागेतून गणेशभक्त महागणपतीच्या आगमन मिरवणूक सोहळ्याचे क्षण डोळ्यात साठवत होते. जास्वंदावरील २२ फुटी महागणपतीची मूर्ती लालबाग उड्डाणपुलाखालून जाताना अनेक भक्तांनी गणेशमूर्तीचे दर्शन घेतले. तसेच बाप्पासोबत सेल्फी घेण्याचा मोह काहींना आवरला नाही.

मुंबईकरांनो लक्ष द्या! उद्या तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक; वाचा संपूर्ण वेळापत्रक

किचन बजेट बिघडणार! घरगुती गॅस सिलिंडर ६० रुपयांनी महागला; नवे दर आजपासून लागू

T20 Final साठी रेल्वेची खास सोय; मुंबई-पुण्याहून अहमदाबादसाठी स्पेशल ट्रेन, वाचा वेळापत्रक

समुद्रात अडकलेल्या रशियन तेलाची भारतीय कंपन्यांकडून खरेदी; अमेरिकेकडून महिन्याभराची सवलत मिळाल्याचा परिणाम

ठाणेकरांनो लक्ष द्या! कल्याण-शिळ रोडवर ३१ मार्चपर्यंत वाहतूक बंद; पर्यायी मार्ग कोणते?